Maharashtra Government Decisions 10% Reservation For Ex-agniveers saam tv
महाराष्ट्र

Cabinet Meeting: अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10 टक्के आरक्षण; राज्य सरकारनं घेतले १० महत्त्वाचे निर्णय

State Government Decision: महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी गट-क मधील गणवेशधारी सेवांमध्ये 10 टक्के समांतर आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच राज्यात वैरण विकास धोरणही जाहीर करण्यात आले आहे.

Bharat Jadhav

  • माजी अग्निवीरांसाठी महाराष्ट्रातील शासकीय नोकऱ्यांमध्ये 10 टक्के समांतर आरक्षण

  • राज्यात महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर करण्यात आले असून पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढवण्यावर भर

  • छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज येथील न्यायदंडाधिकारी न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी 459 पदांच्या भरतीचाही निर्णय

छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयासाठी मंजुरी, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठातील ४५९ पदांच्या भरतीसह राज्य सरकारनं अग्नीवीरांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 'अग्निपथ' योजनेअंतर्गत भरती झालेल्या 'अग्निवीरांचा' पहिला गट एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला आहे. त्यांचा चार वर्षांचा सेवा कालावधी या वर्षाच्या अखेरीस संपणार आहे.या अग्नीवीरांसाठी अनेक राज्य सरकारांनी महत्त्वाचे निर्णय घेतलेत.

राज्य सरकारनं आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत

महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत दहा टक्के समांतर आरक्षण. गट – क मधील गणवेशधारी सेवांच्या पदांवर नियुक्ती मिळणार. सैन्य दलातून चार वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेल्या अग्निविरांना सेवेत दाखल करून घेण्याचे धोरण निश्चित. (सामान्य प्रशासन विभाग)

महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर. राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार. जिल्हानिहाय चारा उत्पादन, लागवडीयोग्य गवतांची यादी, वैरण उपयुक्त वृक्षांची यादी, सुधारित चारा पिके, पारंपरिक व अपारंपरिक चारा स्त्रोत यांचा साकल्याने विचार. विविध शासकीय वैरण विकास योजनांचे नियोजन. दुग्धव्यवसाय आणि पशुपालन या शेतीपूरक व्यवसायास चालना मिळणार. (पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग)

• न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचा २ हजार ७६१ पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर. (गृह विभाग)

• 'महाराष्ट्र कारागृहे सुधारसेवा अधिनियम, २०२५ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी. (गृह विभाग)

• नागपूर जिल्ह्यातील मौ. बेला (ता. उमरेड) येथील २ हेक्टर ३७ आर शासकीय जमीन नागपूर- म्हाडास देण्यास मंजुरी. म्हाडा याठिकाणी गरजू व गरिबांसाठी परवडणारी घरे (Smart Village) प्रकल्प साकारणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)

• सूर्या प्रकल्पग्रस्तांना ५६ वर्षानंतर न्याय. पालघरच्या नेवाळे, हनुमाननगरमधील जमिनींच्या फेरवाटपास मान्यता. प्रकल्पग्रस्तांची नावे सातबारावर नोंदण्यास मान्यता. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)

• मुंबईतील वांद्रे (ता.अंधेरी) येथील भुखंडाच्या भाडेपट्ट्याच्या नुतनीकरणास मंजुरी. नॅशनल सोसायटीज फॉर क्लीन सिटीज सामाजिक संस्थेस दिलेल्या ६ हजार ११० चौ. मी. जमिनीच्या भाडेपट्ट्याच्या नुतनीकरणास मंजुरी. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)

• मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर – सर्किट बेंचकरिता (फिरते खंडपीठ) विविध संवर्गातील ४५९ पद निर्मितीस मंजुरी. गट अ ची २०, गट ब – ३५, गट क – २७६ आणि गट ड ची १२८ पदे. या पदांसाठी अनुषंगाने येणाऱ्या खर्चाच्या तरतुदीस मंजुरी. (विधि व न्याय विभाग)

• छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय होणार. न्यायालय स्थापनेस व त्यासाठीच्या न्यायिक अधिकारी व कर्मचारी यांच्या पदांना व खर्चाच्या तरतुदीस मंजुरी. (विधि व न्याय विभाग)

• महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण – २०२४ मध्ये सुधारणा. धोरणांतर्गत झोन – ३ मध्ये स्थापन होणाऱ्या लॉजिस्टिक्स पार्क्स, पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विशेष भांडवली प्रोत्साहन मिळणार. जिल्हानिहाय विकसित करण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक्स पार्कची कमाल संख्येचा निकष रद्द. झोन १, २ मधील पार्कंना शंभर टक्के, तर झोन ३ मधील पार्कना ७५ टक्के मुद्रांक शुल्कात सवलत. राज्यस्तरीय समित्यांच्या रचनेत सुधारणा. (उद्योग, गुंतवणूक, सेवा व खनिकर्म विभाग)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घोडा अडकला, टायगर वाचला; आरोपींचं फूलप्रुफ प्लॅनिंग, पोलिसही चक्रावले

शिंदे टायगरला भेटले 'राम'ला का नाही? प्रदिप पूर्णेकरांच्या मुलाचा शिंदेंना थेट सवाल

टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली; बॉलीवूड भीतीच्या छायेत

Gokul Election Result: गोकुळच्या निवडणुकीत महाडिक कुटुंबाला धक्का! शौमिका महाडिकांचा दारूण पराभव

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घ्यावे लागणार? ९२ हजार अपात्र लाभार्थ्यांमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT