Maharashtra School Holiday News Saam Tv
महाराष्ट्र

School Closed : राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर; वाचा नेमकं कारण काय?

Maharashtra School Holiday News : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पवार कुटुंबासह महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी शासकीय सुट्टी जाहीर केली असून शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर

  • अजित पवार यांच्या निधनानंतर 3 दिवसीय दुखवटा जाहीर

  • महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला

राज्यात येत्या आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी अपघाती निधन झालं. या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात तीन दिवसीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत शोकजनक ठरला आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार सभांच्या निमित्ताने अजित पवार मुंबईहून बारामती दौऱ्यावर निघाले होते. मात्र बारामतीत लँडिंग करताना विमान कोसळून आग भडकली. यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक, वैमानिक यांचा समावेश आहे. अजित पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबासह राष्ट्रवादीचे समर्थकांवर शोककळा पसरली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शिवाय देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही बारामतीसाठी रवाना झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली असून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच नाही तर अगदी दिल्ली पर्यंतच्या नेत्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. तसेच अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी देखील टाहो फोडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : राज ठाकरे थोड्यात वेळात बारामतीला जाणार

Kitchen Hacks : दुधाने जळलेले भांडे कसे साफ करावे? वापरा 'या' झटपट घरगुती टिप्स

Ajit Pawar Death: अजित पवारांचा जन्म कुठे झाला? जाणून घ्या त्यांचे सुरुवातीचे जीवन

Ajit Pawar Death : कार्यकर्त्यांना जपणारा नेता....उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Ajit Pawar Death : अजित पवारांचं फोनवरून शेवटचं बोलणं कुणासोबत झालं?

SCROLL FOR NEXT