viral video Saam Tv
महाराष्ट्र

Bhandara News: कोब्रासोबत स्टंट करायला गेला अन् जीव गमावून बसला, भंडाऱ्यातील तरुणाचा VIDEO व्हायरल

Cobra Viral Video : गोंदियातील घोगरा गावात कोब्रा पकडण्याचा प्रयत्न करताना लक्की बागडे या तरुणाचा मृत्यू झाला. सर्पदंश झाल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून वनविभागाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Alisha Khedekar

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील घोगरा येथे धक्कादायक घटना घडली आहे. स्टंटबाजी करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला आहे. शेजाऱ्यांच्या घरात साप आढळल्याने कोणतेही प्रशिक्षण नसताना साप पकडायला गेलेल्या तरुणाला कोब्रा सापाने दंश केला आहे. या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लक्की बागडे असे मृतक तरुणाचे नाव आहे.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील घोगरा या गावात कुंभरे यांच्या घरी साप आढळून आला. ही माहिती मिळताच गावकऱ्यांनी कुंभरे यांच्या घरी गर्दी केली. गावातील लक्की बागडे या तरुणाला साप पकडण्याचे कोणतेही प्रशिक्षण नसताना स्टंट बाजी करत लक्कीने सापाला पकडण्याचे धाडस केले. साप पकडण्यास गेला असता लक्कीला कोब्रा सापाने दंश केला.

दरम्यान साप चावल्याने त्याला तातडीने भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील उपजिल्हा रुग्णांमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालय भंडारा येथे नेण्यात आले याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशाप्रकारचे साप घरी आढळल्यास वन्यजीव सुरक्षकांना कळवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT