Maharashtra Kolhapur Aadmapur Balumama Temple Closed News Saam Tv
महाराष्ट्र

Balumama Temple : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, बाळूमामांचे मंदिर ३ दिवस राहणार बंद, नेमकं कारण काय?

Maharashtra Kolhapur Aadmapur Balumama Temple Closed News : कोल्हापूर मधील आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा मंदिर ३ ते ६ मार्चदरम्यान भंडारा उत्सवाच्या तयारीसाठी बंद राहणार आहे. स्वच्छता आणि व्यवस्थापनाच्या कामांनंतर ९ मार्चपासून मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले होणार आहे.

Alisha Khedekar

  • आदमापूर बाळूमामा मंदिर ३ ते ६ मार्च दर्शनासाठी बंद

  • भंडारा उत्सवासाठी स्वच्छता आणि व्यवस्थापनाची तयारी सुरू

  • लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने समितीचा निर्णय

  • ९ मार्चपासून मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले होणार

भाविकांनो येत्या काही दिवसांत आदमापूर येथील सद्‌गुरू बाळूमामा मंदिरात दर्शनासाठी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. येत्या मार्च महिन्याच्या सुरुवातीला ३ मार्च ते ६ मार्च दरम्यान बाळूमामा मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. नऊ मार्चपासून सुरू होणाऱ्या वार्षिक भंडारा उत्सवाच्या तयारीसाठी मंदिर समितीने हा निर्णय घेतला असून भाविकांनी त्याचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) इथले सद्‌गुरू बाळूमामा मंदिर ३ मार्च ते ६ मार्चअखेर दर्शनासाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. नऊ मार्चपासून सुरू होणाऱ्या वार्षिक भंडारा उत्सवाच्या तयारीसाठी मंदिर परिसर, अन्नछत्र, भक्तनिवास, तसेच देणगी विभागात व्यापक स्वच्छता आणि नियोजनबद्ध तयारी हाती घेण्यात येणार आहे.

मंदिर परिसरात दररोज हजारो भाविकांची वर्दळ असते. भंडाऱ्याच्या पार्श्वभूमीवर लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने व्यवस्थापनाकडून पूर्वतयारीला प्राधान्य देण्यात आले आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले , कार्याध्यक्ष पुंडलिक होसमणी यांनी भाविकांनी या कालावधीत मंदिरात येण्याचे टाळावे व सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

उत्सव अधिक सुव्यवस्थित आणि स्वच्छ वातावरणात पार पाडण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. नऊ मार्चपासून मंदिर पुन्हा भक्तांसाठी खुले होणार असून, भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

फडणवीसांनी त्यांना सोडलं तर समजायचं त्यांचाच हात आहे! व्हायरल ऑडिओ क्लिपवरून जरांगे पाटलांचा थेट इशारा

Dry Fruits Buying Tips: मिठाईऐवजी ड्रायफ्रूट्स आवडीने खाताय? थांबा, बाजारात आला बनावट सुकामेवा, असं ओळखा खरं काजू-बदाम

Car paint protection: कारचा रंग आणि चमक टिकवायचीये? या 7 टीप्सने गाडी वाटेल नवी कोरी

NCP Merger : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठे विधान, अर्थ खात्यावर स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT