Accused fake baba Sanjay Pagar performing illegal aghori rituals in Shiur village; now facing charges under the Anti-Superstition Act. Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News: मुलं होण्यासाठी अमानवी चाचण्या; लघुशंका पाजत अघोरी पूजा

Shock in Sambhajinagar: संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर गावात एका भोंदू बाबाचं पितळ उघड पडलंय... हा भोंदू बाबा पुत्र प्राप्तीसाठी जादूटोणा करुन अघोरी पूजा करायचा.. इतकच नव्हे तर लघूशंका करून लोकांना प्यायला द्यायचा... या प्रकरणात संबंधीत बाबावर, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय..

Omkar Sonawane

कुणाला मूल होत नाही, लग्न होत नाही, कुणाचे काम होत नाहीत, कोणीतरी सातत्याने करणे भानामती करतो, भूतबादा होते हे सगळं काढून टाकण्यासाठी आघोरी प्रकार करणाऱ्या एका भोंदू बाबाचा पर्दाफाश अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केलाय

भोंदू बाबा अघोरी कृत्य करताना लघु शंका पाजायचा त्यांच्या छातीवर उभा राहायचा वाटेल ते करून घ्यायचा आणि ते रोग निमूटपणे सहन करायचे हे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील शिऊरमध्ये अंधश्रद्धेचा प्रकार, एका भोंदू बाबा विरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील बिरोबा मंदिर परिसरात अंधश्रद्धा आणि अमानुष कृत्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संजय रंगनाथ पगार यांच्याविरुद्ध वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी किशोर शांताराम आघाडे (वय 40, व्यवसाय-नोकरी, पोह 13/30, वैजापूर पोलीस स्टेशन) यांनी सरकारतर्फे तक्रार दाखल केली आहे.

17 जुलै रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास शिऊर येथील मंदिर परिसरात अंधश्रद्धेचा प्रकार मागील अनेक महिन्यापासून सुरू होता. आरोपी संजय पगार यांनी एका व्यक्तीला मंदिरात बसवून त्याच्या अंगावर भंडारा टाकला आणि मंत्रांचा जप करत ढोलकी वाजवत "अलख निरंजन, अलख निरंजन" असे ओरडत होता. यानंतर त्यांनी त्या व्यक्तीला उभे करून त्याच्या नाकाला बूट लावल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, एका व्हिडिओमध्ये संजय पगार यांनी त्या व्यक्तीला जमिनीवर उताणे झोपवून त्याच्या मानेवर पाय ठेवला आणि पोटावर काठी ठेवून "सोड त्याला, सोड त्याला, नाहीतर धोपटी घालीन" अशी धमकी देताना दिसत आहेत. पोलिस कारवाई: हा सर्व प्रकार एका व्हिडिओद्वारे उघडकीस आला असून, याच्या आधारे फिर्यादी किशोर आघाडे यांनी शिऊर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. सदर प्रकरणाचा तपास पोलीस करत असून, आरोपीविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: झालं ते चुकीचं झालं, मारहाणीचा कडक शब्दात निषेध - तटकरे

Sabudana Rabdi Recipe: श्रावण सोमवारच्या उपवासाला काही खास हवंय? घरच्या घरी बनवा साबुदाणा रबडी, वाचा रेसिपी

Akola Crime : आधी मंगळसूत्र चोरलं, नंतर परत देत चोरट्यांनी महिलेला माफी मागितली; नेमकं काय घडलं?

Today Gold Rate: सोन्याचे भाव पुन्हा १ लाखांच्या पार; वाचा २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर

वडिलांच्या संपत्तीसाठी मुलगा हैवान, जन्मदात्या आईला वृद्धश्रमात अन् बहिणीला मेंटल हॉस्पिटलमध्ये धाडलं | Pune

SCROLL FOR NEXT