Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार? एक्झिट पोलचा अंदाज आला समोर, वाचा

maharashtra exit poll 2024 : विधानसभा निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर राज्यातील पोल डायरीचे एक्झिट पोल समोर आला आहे. या पोलमध्ये महाविकास आघाडीला मोठा बसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडलं. राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद झालं आहे. राज्याचा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. या निकालाआधी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे. या पोलच्या अंदाजात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

पोल डायरीने जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. या पोलमध्ये महायुतीला १२२ ते १८६ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला ६९ ते १२१ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोल डायरीच्या या एक्झिट पोलमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे.

पोल डायरीच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला अच्छे दिन पाहायला मिळत आहे. या पोलमध्ये भाजपला ७७-१०८ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. शिंदे गटाला राज्यात जवळपास २७-५० जागा मिळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तर अजित पवार गटाला १८ ते २८ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीची एकूण आकडेवारी सत्तेस्थापनेसाठी पुरक असल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. या पोलने महायुतीला मोठा दिलासा दिला आहे.

पोल डायरीच्या अंदाजमध्ये काँग्रेसला एकूण २८ ते ४७ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ठाकरे गटाला १६ ते ३५ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर शरद पवार गटाला २५ ते ३९ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पोलमध्ये महायुतीला दिलासा तर महाविकास आघाडीला धक्का बसत असल्याचे दिसत आहे.

एक्झिट पोल

पोल डायरी

भाजप - ७७ - १०८

शिंदे गट - २७-५०

राष्ट्रवादी अजित पवार - १८-२८

काँग्रेस - २८-४७

ठाकरे गट - १६-३५

राष्ट्रवादी शरद पवार गट - २५-३९

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

SCROLL FOR NEXT