Maharashtra Politics :  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : कोकणातील भाजपच्या विजयाचा शिल्पकार कोण? महायुती कोणामुळे मविआवर पडली भारी? वाचा

mahayuti politics : कोकणात भाजप महायुतीला मोठं यश मिळाल्याचं दिसतंय. कोकणातील ३९ जागांपैकी तब्बल ३६ जागा महायुतीला मिळाल्या आहेत.

Vishal Gangurde

गणेश कवडे, साम टीव्ही

मुंबई : महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं आहे. राज्यात महायुतीने २३० जागांवर बाजी मारली आहे. कोकणातही महायुतीने मोठी आघाडी घेतली. कोकणात ३९ पैकी ३६ जागांवर विजय मिळवला. कोकणात महायुतीने महाविकास आघाीला मोठा दणका दिला आहे. कोकणात महायुतीच्या विजयाच्या पडद्यामागील शिल्पकार समोर आला आहे.

वसई-विरारपासून भिवंडी, रत्नागिरी आणि अगदी तळ कोकणापर्यंत उद्धव ठाकरे व हितेंद्र ठाकूर यांचा बालेकिल्ला असलेल्या भागात भाजपसह महायुतीने विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. या घवघवीत यशामागील सूत्रधार समोर आले आहेत. भाजपचे नेते व मंत्री रवींद्र चव्हाण आणि त्यांचे स्वीय सहाय्यक असलेले अनिकेत पटवर्धन यांनी ही किमया करून दाखवलेली आहे.

अनिकेत पटवर्धन यांच्याकडे कोकणातील महायुतीचे समन्वयकपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. महायुतीमध्ये अचूक समन्वय साधत व ठाकरे-ठाकूर यांचे बालेकिल्ले उध्वस्त केले. या भागात महायुतीने ३९ पैकी तब्बल ३६ जागांवर एकहाती विजय संपादित केला आहे. या एकहाती विजयासाठी मदत केल्याबद्दल पटवर्धन यांनी फडणवीसांची भेट घेत आभार मानले. तर या विजयाबाबत फडणवीस यांनीही पटवर्धन यांचे अभिनंदन केले आहे.

कोकणातील यशावर निलेश राणे काय म्हणाले?

कोकणमधील महायुतीच्या यशावर आमदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निलेश राणे म्हणाले, 'कोकण हा कधीच उद्धव ठाकरेंचा नव्हता. उरलेली शिवसेना आम्ही पाठवून दिली. दहा वर्षानंतर पदावर आलो आहे. काम करून दाखवायचं आहे'. a

'पद मिरवण्यासाठी नसतं. महाराष्ट्रासाठी काहीतरी करायचे. विधानसभेत कोणी वेडं वाकडं बोललं, तर त्याला जागेवर धडा शिकवू. लोकसभेला आम्ही एकाला पाठवून दिलं आहे. आता उरलेसुरलेले विधानसभेला पाठवून दिले, अशी टीका राणे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT