महाराष्ट्र

CM योगींच्या बंदोबस्तावरून परतताना पोलिसाचा अपघातात मृत्यू

Policeman Accident: योगी आदित्यनाथ यांच्या बंदोबस्तावरून परताना एका पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेसाठी बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसाचा अपघातात मृत्यू झालाय. हा अपघात अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ठाकूर फाट्यासमोरील उर्ध्व वर्धा कालव्याजवळ घडला. संदीप देविदास ३९ वय असे या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. संदीप चौधरी हे २००८ पासून पोलीस दलात कार्यरत होते. सध्या ते चांदुर बाजार पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत होते.

राज्यात विधानसभा निवडणुकींसाठी उमेदवारांचा प्रचार सुरू झालाय. राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार केला जात आहे. प्रचारांसाठी नेत्यांची फळी मैदानात उतरवलीय. महायुतीने साधारण ४० पेक्षा जास्त नेत्यांना स्टार प्रचारकाची जबाबदारी दिलीय. आज भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा अमरावती येथील गुरूकुंज मोझरी येथे होती.

या सभेसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याच बंदोबस्तसाठी संदीप देविदास तैनात होते. दुपारी योगी आदित्यनाथ यांची सभा संपल्यानंतर ते घरी परतत होते. परतीचा प्रवास करताना मरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर त्यांचा अपघात झाला. तळेगाव ठाकुर फाट्यासमोर उर्ध्व वर्धा येथे त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.

अमरावतीहुन गडचिरोली जाणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीसह संदीप चौधरी यांना एसटी बसने काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यामधे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लटकलेल्या अवस्थेत वडील, तर जमिनीवर आईचा मृतदेह; घरातील दृश्य पाहून सगळेच हादरले

Maharashtra Live News Update: नाशिकच्या भद्रकाली परिसरात दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

Artist Death: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा; ३१ वर्षीय कलाकाराचे अकाली निधन

Paithani Or Silk Saree Blouse Designs: पैठणी आणि सिल्क साड्यांवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, एकदा नक्की ट्राय करा

Mosquito Safety: डासांसाठी अगरबत्ती घेताय? त्या आधी ही माहिती वाचाच

SCROLL FOR NEXT