Latur police launch Police Aaplya Gavi initiative saam tv
महाराष्ट्र

दुष्काळात गुन्हेगारीचा सुळसुळाट, कायदा- सुव्यवस्था बिघडली, पोलिस यंत्रणा अलर्ट

Maharashtra Drought Increases Theft: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. लातूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पशुधन, विद्युत मोटारी आणि घरफोडीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम सुरू आहे.

Suprim Maskar

दुष्काळामुळे आधीच शेतकरी हवालदिल झालेलाय आणि त्यात आता त्याला सामना करावा लागतोय चोऱांचा...शेतातील विहिरींवरील मोटारी, पशुधन आणि दुचाकींच्या वाढत्या चोऱ्या म्हणजे बळीराजासाठी दुष्काळात तेरावा महिना.. एकीकडे शेतात चारा-पाण्याचा भीषण तुटवडा निर्माण झालाय, तर दुसरीकडे शेतात हाताशी उरलेली साधनसामग्री आणि जनावरे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे.

गेल्या पंधरा दिवसांत लातूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 11 पशुधन चोरी, तर 1 विद्युत मोटारीची घटना घडलीय.. दरम्यान लातूरमध्ये चोरीचं प्रमाण वाढल्यानं हैराण झालेल्या पोलीसांनी आता ‘पोलीस आपल्या गावी’ हा विशेष उपक्रम हाती घेतलाय...

दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्येही वाढत्या चोऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रामीण पोलीस यंत्रणा अलर्ट झालीय. छत्रपती संभाजीनगर वेगवेगळया पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्युत मोटर चोरीच्या जवळपास 20 पेक्षा अधिक घटना घडल्याचं समोर आलंय.

तर जनावरे चोरीच्या घटना 15 पेक्षा अधिक झाल्यात.

किरकोळ चोरी, घरफोडी च्या घटनात वाढ झालीय. जिल्ह्यात या महिनाभरात 100 हून अधिक घटना घडल्यात. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली असून ग्राम सुरक्षा दलांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेत..

दुष्काळाच्या या कठीण काळात आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला गुन्हेगारांच्या तावडीतून वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि ग्राम सुरक्षा दल मैदान उतरलयं....मात्र प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेनंतर ग्रामीण भागातील गुन्हेगारीला वेसण बसेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेस आमदारचा भीषण अपघात; MLAच्या कारची इलेक्ट्रिक स्कूटरला जोरदार धडक

ते कोणत्या देशद्रोहीला ब्लॅकमेल करत आहेत? रुबिओंच्या मुंबई भेटीवरून राहुल गांधींचं मोठं विधान; एपस्टीन फाईल्सवरून अमेरिकेचा भारतावर दबाव?

दुष्काळाची दाहकता वाढली, पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Dombivli Crime : त्या रात्री डोंबिवलीच्या तरुणासोबत नेमकं काय घडलं? 24 तासांत गूढ उकललं

CJP नेत्यांच्या पायात कायद्याच्या बेड्या, CJP समोर चार मोठी आव्हानं

SCROLL FOR NEXT