राज्यातील दुष्काळाची दाहकता... बळीराजाची ही अवस्था राज्याला सुन्न करून टाकणारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांंधावर गेलेत. यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटताच शेतकऱ्यांनी अक्षरशः त्यांच्या गळ्यात पडून टाहोच फोडला...
मुख्यमंत्री फडणवीसांनी लातूर आणि धाराशिवमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जात व्यथा ऐकून घेतलीये. एव्हंढच नव्हे तर बळीराजासाठी सर्व काही करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलीय.
दरम्यान, पीकं करपून गेल्यानं शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाईची आशा आहे. तर दुसरीकडे, दुष्काळग्रस्त भागांच्या दौऱ्यावेळी पहिली अधिसूचना शनिवारपर्यंत काढणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केलाय... विरोधकांनी मात्र दुष्काळग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये देण्याची मागणी केलीय. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी बांधावर जाऊन दुष्काळाची पाहणी केलीय. तर दुसरीकडे पंचनामेही सुरू झाले आहेत. शनिवारी दुष्काळ जाहीर होणार असला तरी नेमकी किती मदत मिळणार याकडे दुष्काळग्रस्तांचे नजरा लागल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.