Maharashtra Drones spotted in Jalna Buldhana Parbhani and Hingoli Saam Tv News
महाराष्ट्र

Drone in Maharashtra : महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यात 'ड्रोन'? जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट मोडवर; राज्यात खळबळ

Drone in Maharashtra : महाराष्ट्रातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील परभणी, बुलढाणा आणि जालना या जिल्ह्यात ड्रोन सदृश वस्तू दिसली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Prashant Patil

परभणी : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढला असून चहूबाजूने गोळीबार आणि हवाई हल्ला सुरू आहे. गुरुवारी रात्रीपासूनच पाकिस्तानकडून द्रोण हल्ले सुरू आहे. मात्र भारताने सर्व द्रोण हल्ले हाणून पाडले. आज पुन्हा उरी सेक्टरमध्ये संध्याकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची घटना समोर आली आहे. त्याचदरम्यान, महाराष्ट्रातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील परभणी, बुलढाणा आणि जालना या जिल्ह्यात ड्रोन सदृश वस्तू दिसली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

परभणीच्या सेलू,गंगाखेड तालुक्यातून आकाशात ड्रोन सदृश वस्तू दिसली आहे. मात्र, गावकऱ्यांमध्ये कुतूहलाचा विषय निर्माण झाला आहे. एकीकडे भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु आहे. त्याच अनुषंगाने अनेक ठिकाणी मॉक ड्रिल घेतलं जात आहे. याचदरम्यान परभणीच्या सेलू आणि गंगाखेड तालुक्यातून आकाशात एकाच लाईनमध्ये अनेक ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्या आहेत. ग्रामीण भागात यामुळे कुतूहलला विषय झालाय. या काही भागात भीतीचं वातावरणही पसरलं आहे.

तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा परिसरात आज सायंकाळी अनेक वस्तू आकाशातून एका रांगेत जाताना दिसल्या. चकाकणाऱ्या या रांगेत जाणाऱ्या आकाशातील वस्तूंमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नेमक्या हे काय आहे? याबाबत आता परिसरात चर्चेला उधाण आलं आहे. तिकडे भारत-पाकमध्ये हल्ला हमला सुरु असताना अशा वस्तू आकाशातून जाताना दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या कोणत्या वस्तू आकाशातून जात आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

जालना जिल्ह्यातील मंठा, घनसावंगी, परतूर याठिकाणीही ड्रोन सदृश वस्तू दिसल्या आहेत. पोलीस प्रशासनाकडून ड्रोन सदृश वस्तूचा शोध सुरू आहे. जालना जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्या आहेत. जालना जिल्ह्यातील मंठा, घनसावंगी आणि परतुरध्ये अनेक गावांमध्ये ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्यानं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून या ड्रोन सदृश्य वस्तूचा शोध सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांना बळी पडू नये, असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे.

त्याचदरम्यान, हिंगोली जिल्ह्यातही ड्रोन सदृश्य वस्तू दिसली आहे. नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात फोटो आणि व्हिडिओ काढले आहे. औंढा तालुक्यातील गोजेगाव शिवारात नागरिकांना हे चित्र दिसलं आहे. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT