Maharashtra Covid Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra: राज्यासाठी दिलासादायक बातमी; 23 महिन्यांनंतर कोविडमुळे एकही मृत्यू नाही!

महाराष्ट्रासाठी एक चांगली बातमी आहे. कोरोनाच्या संकटात 23 महिन्यांनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात कोविडमुळे (Covid-19) एकही मृत्यू झालेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: महाराष्ट्रासाठी एक चांगली बातमी आहे. कोरोनाच्या संकटात 23 महिन्यांनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात कोविडमुळे (Covid-19) एकही मृत्यू झालेला नाही. महाराष्ट्रात (Maharashtra) बुधवारी कोविड-19 चे 544 नवीन रुग्ण आढळले, ज्यामध्ये ओमिक्रॉनच्या 38 केसेसचा समावेश आहे. (Maharashtra Covid Update)

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आज महाराष्ट्रात कोविड-19 चे 544 नवीन रुग्ण आढळून आले असून, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 78,66,924 वर पोहोचली आहे आणि मृतांची संख्या 1,43,706 वर स्थिर आहे.

हे देखील पहा-

ते म्हणाले की, नवीन प्रकरणांमध्ये, 38 प्रकरणे ओमिक्रॉन (Omicron) स्वरूपाची आहेत, त्यापैकी 37 प्रकरणे पुण्यात (Pune) आणि एक औरंगाबादमध्ये (Aurangabad) नोंदवली गेली आहे. आरोग्य विभागाच्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 1,007 लोकांनी साथीच्या आजारावर मात केली असून, एकूण संक्रमित लोकांची संख्या 77,13,575 झाली आहे. त्यात म्हटले आहे की राज्यात आता 5,643 उपचाराधीन आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT