Corona Update saam tv
महाराष्ट्र

Corona Updates : राज्यात कोरोनाचा विस्फोट! आज आढळले 8 हजार 67 नवीन रुग्ण!

राज्यात एकाच दिवसात 8 हजार 67 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. काल 5368 रुग्ण होते. केवळ २४ तासात रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने विस्फोटक रुप धारण केले आहे. राज्यात एकाच दिवसात 8 हजार 67 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 77 दिवसांनंतर एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत तर कोरोनाने रेकॉर्ड मोडला आहे. येथे एका दिवसात 5428 रुग्ण आढळले आहेत. मुंबईत एकाच दिवसात इतके रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.

राज्यासह मुंबई पाठोपाठ आता पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात आज तब्बल 412 नवे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे. गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक नवी रुग्णसंख्या आज आढळून आली आहे. हि रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर लवकरच राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील सध्याची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 1 हजार 799 वर पोहोचली आहे.

पुणे शहर कोरोना अपडेट :

आज दिवसभरात पुणे शहरात 412 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर, दिवसभरात रुग्णांना 95 डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज पुणे शहरात कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसला तरी पुण्याबाहेरील एकूण तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 92 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  • पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या - 510218

  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या - 1799

  • एकूण मृत्यू - 03

  • आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज - 499303

नागपूर कोरोना अपडेट :

नागपूरात एकाच दिवशी 90 नवे कोरोना पॉझिटिव्ह

शहरात 81 तर ग्रामीण मध्ये 9 रुग्ण

गेल्या चोवीस तासात रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. सहा महिन्यानंतर कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला आहे. नागपूरकरांसाठी धोक्याची घंटा!

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT