Covid-19 Variant News  Saam Tv
महाराष्ट्र

Covid-19 Variant : भारतीयांची चिंता पुन्हा वाढली! चीनमधील कोरोना व्हेरिएंट महाराष्ट्रात; पहिल्यांदा आढळले ३ रुग्ण

चीनमध्ये BF.7 कोरोना व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. वाढत्या कोरोना रुग्णामुळे चीनमधील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Corona Update : चीनमध्ये BF.7 कोरोना व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. वाढत्या कोरोना रुग्णामुळे चीनमधील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. याचदरम्यान, चीनमधील BF.7 कोरोना व्हेरिएंटचे तीन रुग्ण मुंबईत आढळले आहेत. यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. (Latest Marathi News)

परदेशातून मुंबईत आलेल्या ३ जण कोरोनाबाधित (Corona) आढळलेले आहेत. पहिल्यांदा BF.7 कोरोना व्हेरिएंट बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ जणांना सौम्य लक्षणे होते. तर एकाला लक्षणे नव्हते. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार कोरोनाबाधित तिघेही पूर्णपणे बरे झाले आहेत.

तिन्ही कोरोनाबाधित रुग्णांनी काही दिवसांपूर्वी चीनमध्ये प्रवास केला होता. चीनमधून (China) परतल्यानंतर त्यांना चीनमधील कोरोना व्हेरिएंटची लागण झाली. या तिघांपैकी एकाला कोणत्याही प्रकारची लक्षणे नव्हते. तर दोघांना सोम्य लक्षणे होते. त्यांना खोकला आणि ताप हे लक्षणे होते. त्यामुळे त्यांना विलीगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर हे तिघे कोरोनाबाधित बरे झाले आहेत.

दरम्यान, आतापर्यंत मुंबई विमानतळावर आरटीपीसीआर चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या २३ जणांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. तर २३ जणांपैकी ५ मुंबईतील , ४ गुजरातमधील, ३ पुण्यातील आणि २ केरळमधील तर उरलेले प्रत्येकी एक रुग्ण नवी मुंबई, अमरावती, सांगली, गोवा, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, आसाम, ओडिशा आणि तेलंगणामधले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळावर आरटीपीसीआर चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्याचे आदेश केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सामच्या बातमीचा इम्पॅक्ट: नीट पेपरफुटीनंतर त्या इंटिग्रेटेड महाविद्यालयांवर होणार कारवाई, शिक्षण विभागाचे आदेश

Maharashtra News Live Update: आदिवासी बांधवाच्या जागेवर बेकायदेशीर घरकूल बांधकाम

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ११ उमेदवारांची घोषणा; कोण-कोणाला मिळालं तिकीट? जाणून घ्या

Face Care: चेहऱ्यावरचे डाग आणि टॅन कमी करुन ग्लोईंग चेहरा पाहिजे? रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT