महाराष्ट्र

Corona Update: राज्यात कोरोनाचं संकट वाढलं; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आढळले सर्वाधिक सक्रीय रुग्ण

Corona Update: आज आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, ठाण्यात सर्वाधिक १९० सक्रीय कोरोना रुग्ण आढळली आहेत. तर मुंबईत १३७ सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात सक्रीय १२६ रुग्ण आढळून आले आहेत.

Bharat Jadhav

Maharashtra corona Update:

महाराष्ट्रात कोरोना JN.१ च्या नव्या व्हेरियंटचे १९ रुग्ण आढळून आले आहेत. या आकडेवारीनुसार राज्यात जेएन.१ व्हेरियंटचे रुग्णांची एकूण संख्या २९ झालीय. गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १३१ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर या २४ तासांत ५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय.

पुण्यात सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण देशात कोविड-१९च्या सब-व्हेरियंट जेएन-१ चे रुग्णांमध्ये वाढ झालीय. दरम्यान आज नवीन वर्ष साजरं करण्यासाठी होणारी गर्दी बघता केंद्र आणि राज्य सरकारांनी नवीन ओमिक्रॉम सब व्हेरियंट जेएनच्या धोक्याचा इशारा दिलाय.

corona Update

आज आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, ठाण्यात सर्वाधिक १९० सक्रीय कोरोना रुग्ण आढळली आहेत. तर मुंबईत १३७ सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात सक्रीय १२६ रुग्ण आढळून आले आहेत. नाशिकमध्येही कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. नाशिकमधील महात्मानगर परिसरातील दोन महिलांना तर अंबड परिसरातील एका युवकास कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे महापालिकेची आरोग्य-वैद्यकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आलीय.

Maharashtra corona Update

रुग्ण आढळलेल्या परिसरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत आहे. महात्मानगरमधील ३२ वर्षीय महिलेला सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होतं. या महिलेची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटीव्ह आढळून आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोन्यात 800 रुपयांची तर चांदी 1000 ची घसरण

Tula Pahta Movie: पहिलं प्रेम म्हणजे न विसरता येणारी आठवण...; 'तुला पाहता' उलगडणार चित्रपटातून तरल प्रेमाची अनवट कहाणी

8th Pay Commission: शिपाई ते IAS अधिकारी; आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?

Railway Rules : रेल्वेचा मोठा निर्णय! ट्रेनमधील मिडल बर्थ सकाळच्या सुमारास राहणार बंद, काय आहे या मागचं कारण?

दरवाढीचा भडका! डिझेल २५ रुपये, तर पेट्रोल इतक्या रूपयांनी महागण्याची शक्यता; पेट्रोलियम मंत्री नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT