Gondia Police Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ पोलिसांची मोठी कामगिरी; ८९ लाख बक्षीस असलेले ११ नक्षलवादी सरेंडर

Gondia Police News : गोंदिया पोलिसांच्या मोठ्या कारवाईत दरेकसा दलमचे ११ नक्षलवादी आत्मसमर्पित झाले असून २५ लाख बक्षिसाचा विकास नागपूरेही शरण आला आहे. नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे.

Alisha Khedekar

  • दरेकसा दलमचे ११ नक्षलवादी गोंदियात आत्मसमर्पित

  • २५ लाख बक्षिसाचा प्रमुख अनंत पोलिसांच्या ताब्यात

  • पोलिस कारवाईत अत्याधुनिक हत्यारे जप्त

  • दलम जवळपास संपुष्टात

महाराष्ट्र -छत्तीसगड राज्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात नक्षली कारवाया घडवून आणणाच्या नक्षलवाद्यांच्या चळवळीला मोठा हादरा बसला आहे. पोलिसांनी आज केलेल्या मोठ्या कारवाईत दरेकसा दलमच्या ११ नक्षल्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. परिणामी, गोदिया जिल्ह्यातून दरेकसा दलम जवळजवळ संपल्यात जमा झाल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र -छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आज गोंदिया पोलिसांनी मोठी कारवाई करत ११ नक्षलवादीयांनी स्वतःहून आत्मसमर्पण केले आहे. ही मोठी कारवाई गडचिराली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश गोयल, गोंदियाचे पोलिस अधीक्षक गोरख भामरे. तसेच देवरीचे अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांपैकी २५ लाखाचे बक्षिस असलेला दरेकसा दलम प्रमुख विकास नागपूरे याचा समावेश आहे. विकास नागपूरे हा अनंत नावाने दलम मध्ये सक्रीय होता. अनंत हा नक्षल्यांचे पत्रव्यवहार करीत असे. आत्मसमर्पण करणाऱ्या ११ नक्षलवाद्यांपैकी ७ जणांजवळ हत्यार सापडली.

सापडलेल्या हत्यारांमध्ये ३ आधुनिक हत्यारे असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना या कारवाईत मोठे येश मिळाले असून दरेकसा दलमचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे. आता केवळ बोटावर मोजण्याएवढे २ ते ३ नक्षलवादी सदस्य या ठिकाणी शिल्लक असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card Big Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! SC-STसह 5 प्रवर्गांच्या जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय

Ring Side Effects : नेहमी अंगठी घालता? तर वेळीच व्हा सावधान! छोट्याशा रिंगमुळे होतील 'या' ७ गंभीर समस्या

Maharashtra News Live Update: मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील निवासस्थानी लाडक्या गणरायाचे आगमन

Sugar Price: गणेशभक्तांना मोठा दिलासा! साखरेच्या दरात मोठी घसरण, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Sugar Free Modak: डायबिटीजची चिंता न करता खा मोदक; साखरेशिवाय बनवा झटपट आणि हेल्दी 'शुगर फ्री मोदक'

SCROLL FOR NEXT