Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony LIVE Updates Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet Expansion LIVE : देवेंद्र फडणवीस सरकारमधील शिलेदारांची यादी एका क्लिकवर, वाचा

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony LIVE Updates : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाचा पहिला शपथविधी आज नागपूरमध्ये पार पडणार आहे. कुणाचा पत्ता कट होणार? कुणाची लॉटरी लागणार?

Namdeo Kumbhar

कोणाला किती खाती?

भाजप २०, शिवसेना १२, राष्ट्रवादी १० -

आज कोणत्या पक्षाच्या किती नेत्यांनी शपथ घेतली -

भाजप (१९) - १६ कॅबिनेट, ३ राज्यमंत्री

शिवसेना (११) -०९ कॅबिनेट, २ राज्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस (१) - ०८, १ राज्यमंत्री

६ राज्यमंत्री कोण कोण?

योगेश कदम (शिवसेना)

इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)

मेघना बोर्डीकर (भाजप)

पंकज भोयर (भाजप)

आशिष जैयस्वाल (शिवसेना)

माधुरी मिसाळ (भाजप)

टीम देवेंद्रमध्ये कोण कोण?

कॅबिनेटमंत्री कोणते ?

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

अजित पवार, उपमुख्यमंत्री

चंद्रशेखर बावनुकळे (भाजप)

राधकृष्ण विखे (भाजप)

हसन मुश्रीफ (राष्ट्रादी काँग्रेस)

चंद्रकांत पाटील (भाजप)

गिरीश महाजन (भाजप)

गुलाबराव पाटील (शिवसेना)

गणेश नाईक (भाजप)

दादा भुसे (शिवसेना)

संजय राठोड (शिवसेना)

धनजय मुंडे (राष्ट्रादी काँग्रेस)

मंगलप्रभात लोढा (भाजप)

उदय सामंत (शिवसेना)

जयकुमार रावल (भाजप)

पंकजा मुंडे (भाजप)

अतुल सावे (भाजप)

अशोक उईके(भाजप)

शंभूराजे देसाई (शिवसेना)

आशिष शेलार (भाजप)

दत्ता भरणे (राष्ट्रादी काँग्रेस)

शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप)

माणिकराव कोकाटे (राष्ट्रादी काँग्रेस)

जयकुमार गोरे (भाजप)

नरहळी झिरवाळ (राष्ट्रादी काँग्रेस)

संजय सावकरे (भाजप)

संजय शिरसाट (शिवसेना)

प्रताप सरनाईक (शिवसेना)

भरत गोगावले (शिवसेना)

मकरंद पाटील (राष्ट्रादी काँग्रेस)

नितेश राणे (भाजप)

आकाश फुंडकर (भाजप)

बाबासाहेब पाटील (राष्ट्रादी काँग्रेस)

प्रकाश अबिटकर (शिवसेना)

Maharashtra Cabinet Expansion LIVE : योगेश कदम यांना राज्यमंत्रिपद

शिवसेनेचे दिग्गज नेते रामदास कदम यांचा राजकीय वारसा.. दापोलीमधून सलग दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : इंद्रनील नाईक यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्रिपद मिळाले

इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्रिपदाची शपथ दिली. पूसदमधून राष्ट्रादीच्या तिकिटावर ते दुसऱ्यांदा निवडून आले. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर इंद्रनील नाईक यांनी अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. माजी मंत्री मनोहर नाईक यांचा राजकीय वारसा.

Maharashtra Cabinet Expansion LIVE :  मेघना बोर्डीकर यांनी घेतली शपथ

मेघना बोर्डीकर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपमधील महिला नेतृत्व म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये पुढे आल्या. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या. लडीस रामप्रसाद बोर्डीकर यांचा राजकीय वारसा त्यांना मिळाला आहे.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : पंकज भोयर यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ

Maharashtra Cabinet Expansion LIVE : पंकज भोयर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २०२४ विधानसभा निवडणुकीत पंकज भोयर तिसऱ्यांदा आमदार झाले. पंकज भोयर यांनी राजकारणाची सुरूवात काँग्रेसमधून झाली. २०१४ मध्ये वर्ध्यामध्ये पहिल्यांदा भाजप आमदार म्हणून निवडून आले.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : आशिष जैयस्वाल यांना राज्यमंत्रिपद

रामटेकमधून पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले. १९९९ मध्ये पहिल्यांदा रामटेकमधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. महाराष्ट्र खनिकर्म महामंडळाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : माधुरी मिसाळ यांना राज्यमंत्रिपद

पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २०२४ मध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. २०१९ पासून पुणे जिल्हाअध्यक्ष म्हणून काम पाहिले. २००७ मध्ये पुणे महानगरमध्ये नगरसेविका म्हणून सुरूवात.

Maharashtra Cabinet Expansion LIVE :  प्रकाश अबिटकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony LIVE Updates : २०१४ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर राधानगरीमधून निवडून आले. २००९ मध्ये पहिल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला. २०१४ पासून प्रकाश अबिटकर यांनी राधानगरीमधून एकतर्फी विजय मिळवलाय. कोल्हापूरमध्ये शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच त्यांना मंत्रिपद देण्यात आे.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : बाबासाहेब पाटील यांी घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony LIVE Updates : २००९ पासून आमदार आहेत. अहमदपूरमध्ये त्यांनी राष्ट्रवादी वाढण्यासाठी काम केले. रासपामधून ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर गेले होते. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : आकाश फुंडकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony LIVE Updates : तीन वेळा भाजपचे आमदार राहिलेत. २००१४ मध्ये पहिल्यांदा खामगावमधून आमदार म्हणून निवडून आले. बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. दिवंगत भाजप नेते पाडुरंग फुंडकर यांचा मुलगा म्हणून राजकारणात प्रवेश.. आता स्वत:ची ओळख

Maharashtra Cabinet Expansion LIVE : नितेश राणेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony LIVE Updates : कणकवलीमधून नितेश राणे आमदार आहेत. त्यांनी तीन वेळा कणकवलीतून एकतर्फी विजय मिळवलाय. नितेश राणेंच्या रूपाने कोकणात भाजपचा एकमेव आमदार आहे.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : मकरंद पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony LIVE Updates : मकरंद पाटील यांना अजित पवारांनी मंत्रिपदाचा शब्द दिलेला होता. २००९ पासून मकरंद पाटील राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी दादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ते चार टर्मपासून वाईमधून आमदार आहेत.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : कोटाची घडी उघडली, भरत गोगावलेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony LIVE Updates : छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांना वंदन करत भरत गोगावलेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भरत गोगावले २००९ पासून महाड विधानसभेचे आमदार आहेत. २०२४ मध्ये नाराजी दूर करण्यासाठी गोगावले यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद सोपवण्यात आले होते.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : प्रताप सरनाईक यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony LIVE Updates : २००९ मध्ये प्रताप सरनाईक पहिल्यांदा आमदार झाले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रताप सरनाईक शिंदेंसोबत गुहावटीला गेले होते. २००८ मध्ये राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला. ओवळा माजिवाडा येथून चार वेळा आमदार राहिलेत. आता फडणवीस सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहणार

Maharashtra Cabinet Expansion LIVE : संजय शिरसाट यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony LIVE Updates : संजय शिरसाट २००९ मध्ये औरंगाबाद पश्चिममधून पहिल्यांदा आमदार झाले. चार टर्म ते शिवसेनेकडून आमदार आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून सुरूवात. २०२४ मध्ये सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लागली होती. आता कॅबिनेटमंत्री म्हणून काम पाहणार..

संजय शिरसाट यांच्या शपथविधीवेळी जयश्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या.

Maharashtra Cabinet Expansion LIVE :  संजय सावकरेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ

भाजपमधून सलग तिसऱ्यांदा आमदार

२०१४ विधानसभेच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला.

शपथ घेताना जय श्रीरामची घोषणा दिली.

Maharashtra Cabinet Expansion LIVE :  नरहळी झिरवाळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश

विधानपरिषदेचे उपाध्यक्षपद भूषावले

आता मंत्रि म्हणून काम पाहणार

Maharashtra Cabinet Expansion LIVE : माण-खटावचे आमदार जयकुमार गोरेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ.. २००९ मध्ये अपक्ष म्हणून आमदार झाले. तत्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. २०२४ मध्ये ते चौथ्यांदा आमदार झाले.

Maharashtra Cabinet Expansion LIVE :  माणिकराव कोकाटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Cabinet Expansion LIVE : शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ 

Maharashtra Cabinet Expansion LIVE : हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony LIVE Updates : महायुतीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कागल इथं कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदार संघातून सहाव्यांदा निवडून आले असून त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागतात कागल इथल्या गैबी चौक परिसरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून, फटाक्याची आतषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : दत्ता भरणे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली, कोणतं खाते मिळणार?

राजभवन VIP गेटजवळ पोलिसांनी कुमुक वाढवली. जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवला.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : आशिष शेलार यांच्याकडे कॅबिनेट मंत्रालय

Maharashtra Cabinet Expansion LIVE : पाटणचे आमदार शंभूराजे देसाई कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : अशोक उईके यांना कॅबिनेट मंत्रिपद, राज्यपालांनी दिली शपथ

Maharashtra Cabinet Expansion LIVE : पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल सावे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

Beed Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी शपथ घेताच बीडच्या कारखेल गावात जल्लोष

बीडच्या आष्टी तालुक्यातील कारखेल खुर्द येथे पंकजा मुंडे यांनी मंत्री पदाची शपथ घेताच, गावात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला आहे, दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळयासमोर हा जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आलाय.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : बीडमध्ये दुसरे मंत्रिपद, पकंजा मुंडेंनी घेतली कॅबेनिटमंत्रिपदाची शपथ

Maharashtra Cabinet Expansion LIVE : जयकुमार रावल यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Cabinet Expansion LIVE : उदय सामंत यांना कॅबिनेट मंत्रिपद...महत्त्वाचे खाते मिळणार

Maharashtra Cabinet Expansion LIVE : मंगलप्रभात लोढा यांना कॅबिनेटमंत्रिद, संस्कृत भाषेत शपथ घेतली

मंगलप्रभात लोढा यांना कॅबिनेटमंत्रिद, संस्कृत भाषेत शपथ घेतली

Maharashtra Cabinet Expansion LIVE : धनजय मुंडेंना कॅबिनेट मंत्रिपद, राष्ट्रादी काँग्रेसच्या दिग्गजांच्या यादीत

धनंजय मुंडे यांचे शपथविधीसाठी नाव घेतात बीडमध्ये मुंडे समर्थकांचा जल्लोष

शहरात केली फटाक्यांची आतिषबाजी

Maharashtra Cabinet Expansion LIVE : संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले.

Maharashtra Cabinet Expansion LIVE :  मालेगाव बाह्य आमदार दादा भुसे यांना कॅबिनेट मंत्रिपद, राज्यपालांनी दिली शपथ

Maharashtra Cabinet Expansion LIVE : गणेश नाईक यांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी

Maharashtra Cabinet Expansion LIVE : शिवसेनेकडून गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्री, राज्यपालांनी दिली शपथ

Maharashtra Cabinet Expansion LIVE : गिरीश महाजन यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Cabinet Expansion LIVE : शपथविधीसाठी नागपूर पोलिसांचे ढिसाळ नियोजन

राजभवनाच्या गेटवरच अनेक मंत्र्यांच्या गाड्या अडकून.

गुलाबराव पाटील पोलिसांवर नियोजना अभावी संतापले.

राजभवनात अनेक कार्यकर्त्यांची तोबा गर्दी.

खुद्द राजभवनाच्या रस्त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी अडकून

Maharashtra Cabinet Expansion LIVE : चंद्रकांत पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Cabinet Expansion LIVE : शपथविधी सोहळ्यामुळे राजभवन परिसरात मोठी वाहतूक कोंडी

मंत्री पदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांना देखील वाहतूक कोंडीचा फटका

राष्ट्रवादीचे नेते मकरंद आबा पाटील यांना ट्राफीक पोलिसांच्या दुचाकीची मदत घ्यावी लागली

पंकजा मुंडे यांच्या मातोश्री आणि दोन्ही बहीणी देखील शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित

Maharashtra Cabinet Expansion LIVE : राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्रिपद

Maharashtra Cabinet Expansion LIVE : चंद्रशेखर बावनुकळे, राधकृष्ण विखे पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद

चंद्रशेखर बावनकुळे पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणार

Maharashtra Cabinet Expansion LIVE : थोड्याच वेळात शपथविधी होणार, राजभवनावर आमदारांची गर्दी

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिदें, अजित पवार यांच्यासह महायुतीचे दिग्गज नेते राजभवनावर दाखल झाले आहेत.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेकडून शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसोबत देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. पण पाळले नाही - रामदास आठवले

मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देत नाही. कहीजणाना मागच्या वेळी दीड वर्ष टर्म मिळाली. आम्ही आता ठरवलं आहे. आता ५ वर्षात मंत्र्यांना अडीच अडीच वर्ष टर्म देण्यात येणार आहे. आमच त्यावर एकमत झालं आहे.
अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

हिवाळी अधिवेशनाच्या आधी असलेल्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

सरकारने गेल्या अडीच वर्षांमध्ये अनेक मुद्दे प्रलंबित ठेवले असून शेतकऱ्यांपासून गोरगरीब जनतेपर्यंत न्याय प्रलंबित आहे

सरकारच्या काही धोरणा बाबत निषेध म्हणून तसेच जनतेला न्याय न दिल्याबद्दल विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान

सध्या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा काळ मिळणार आहे, अजित पवार यांची माहिती

Maharashtra Cabinet Expansion LIVE : नितेश राणे यांना मंत्रिपदासाठी फोन आल्यानंतर कणकवलीत वाजले फटाके

आमदार नितेश राणे यांना मंत्रिपदासाठी फोन आल्यानंतर कणकवली शहरातील पटवर्धन चौकामध्ये कार्यकर्त्यांनी फटाके लावून आनंद व्यक्त केला. बरेच दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता आणि हा विस्तार आज सायंकाळी होत आहे आणि त्यासाठी आमदार नितेश राणे यांना मंत्रीपदासाठी फोन आल्याने कणकवली मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी फटाके लावून आनंद उत्सव साजरा केला. तसेच आमदार नितेश राणे यांनी व्हीडिओ काॅल करत शुभेच्छाही दिल्या.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : नंदुरबारचे आमदार डॉ विजयकुमार गावीत यांचा मंत्रिपदाचा कोणताही कॉल नाही.....

Maharashtra Cabinet Expansion LIVE :  धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान

परळीची आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रिपदासाठी फोन आलाय. फडणवीस सरकारमध्ये मुंडेंकडे कोणतं खाते जाणार? याची चर्चा सुरू आहे.

Maharashtra Cabinet Expansion LIVE :  छगन भुजबळ यांचं वेट अॅण्ड वॉच

मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांचं नाव अजूनही आलं नाही. त्यामुळे ते नागपूर येथील हॉटेल रेडिसिन ब्ल्यू येथे अद्याप थांबलेले आहेत. सुनील तटकरे हे हे अजित पवार यांच्या स्वागतासाठी गेले असले तरी, भुजबळ मात्र अजूनही हॉटेलमध्येच थांबून आहेत.

शिवसेनेत कुणाला मंत्रिपद?

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, नगरविकास

उदय सामंत

संजय शिरसाट

शंभुराजे देसाई

दादा भुसे

गुलाबराव पाटील

भरत गोगावले

प्रताप सरनाईक

संजय राठोड

योगेश कदम

आशिष जैस्वाल

प्रकाश अबिटकर

विजय शिवतारे

राष्ट्रवादीच्या कोण कोणत्या नेत्यांना लॉटरी?

अजित पवार, उपमुख्यमंत्री, अर्थ मंत्रालय

अदिती तटकरे

हसन मुश्रीफ

बाबासाहेब पाटील

दत्ता भरणे

नरहरी झिरवळ

मकरंद आबा पाटील

इंद्रनील नाईक

भाजपमधून कोण कोण मंत्रिमंडळात?

देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री, गृहमंत्री

चंद्रशेखर बावनकुळे

नितेश राणे

शिवेंद्रराजे भोसले

चंद्रकांत पाटील

पंकज भोयर

मंगलप्रभात लोढा

गिरीश महाजन

जयकुमार रावल

पंकजा मुंडे

राधाकृष्ण विखे पाटील

गणेश नाईक

मेघना बोर्डीकर

माधुरी मिसाळ

अतुल सावे

आकाश फुंडकर

अशोक उईके

जयकुमार मोरे

संजय सावकारे

आशिष शेलार

Maharashtra Cabinet Expansion LIVE : पंकजा मुंडे घेणार मंत्री पदाची शपथ, बीडमध्ये जल्लोष

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. आज त्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर बीडच्या आष्टी शहरांमध्ये पंकजा मुंडेंनी शपथ घेण्यापूर्वीच जल्लोष साजरा करण्यात आला आहे. आष्टीतील अजय धोंडे मित्रमंडळाने हा जल्लोष साजरा केलाय. दरम्यान यावेळी 101 तोफा वाजवत, फटाक्यांची आतीशबाजी करत एकमेकांना पेढे भरवत, जल्लोष साजरा केलाय.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : राणे समर्थकांची घोषणाबाजी

नितेश राणे यांना मंत्रीपदासाठी फोन आल्यानंतर नागपूरच्या नागपूर च्या सेंट्रल पॉईंट हॉटेल बाहेर राणे समर्थकांनी केला जल्लोष

एकमेकांना पेढे भरवत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केला एक जल्लोष

सगळ्यांनी मंत्रीपदात काम करायचं ठरवलं तर मग पक्ष संघटनेत कोण काम करेल मला तशी अपेक्षाही नव्हती.
प्रसाद लाड, भाजप आमदार

Maharashtra Cabinet Expansion LIVE : राष्ट्रवादी काँग्रेसकडून ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, सुनील तटकरे यांची माहिती

आमदार दत्तात्रय भरणे यांना कॅबिनेट मंत्रिपदासाठी वरिष्ठांचा फोन..इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याने इंदापूर मध्ये उत्साहाचे वातावरण. इंदापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते नागपूरला मंत्रिमंडळ सोहळा पाहण्यासाठी दाखल.. दत्तात्रय भरणे यांचे अख्खे कुटुंब नागपूर मध्ये दाखल...

मला मंत्रीपदासाठी नाही तर शपथविधीसाठी फोन आलेला आहे. शपथविधी कोणाचा आहे ते मला माहित नाही. शपथविधीसाठी हजर रहा असा मला बावनकुळे यांचा कॉल आला. मी मंत्री होईल की नाही ते मला माहित नाही.
संजय सावकारे

Maharashtra Cabinet Expansion LIVE : वाई येथील मकरंद आबा पाटील यांना शपथविधीसाठी फोन आला

सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या 5 पैकी एकाही आमदाराला अद्याप फोन आलं नसल्याची माहिती मिळाली आहे. मागील पाच वर्षात महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनी देखील सोलापूरला मंत्रीपदपासून वंचित ठेवलेल होतं.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूरकडे विमानाने रवाना

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून नागपूरकडे विमानाने रवाना झालेत. सकाळपासून अजित पवारांनी बारामतीत विविध ठिकाणी भेटी दिल्या कार्यक्रमातल्या नंतर अजित पवार सकाळी 11 वाजता नागपूरला रवाना झालेत. दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराला अजित पवार हजेरी लावणार आहेत. अजित पवार यांच्या सोबत बारामतीतून त्यांचे चिरंजीव पार्थ पवार देखील नागपूरकडे रवाना झालेत.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : भाजपाचे आमदार संजय सावकारे यांना देखील मंत्री पदासाठी कॉल आल्याची माहिती...ते चौथ्यांदा भुसावळ मतदार संघातून निवडून आले आहेत.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : रविंद्र चव्हाणांकडे भाजप देणार नवी जबाबदारी

रविंद्र चव्हाणांकडे भाजप देणार नवी जबाबदारी

रविंद्र चव्हाण यांकडे देणार भाजप प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी

सूत्रांची माहिती

२०२९मध्ये शतप्रतिशत भाजपसाठी रविंद्र चव्हाणांकडे जबाबदारी

एकट्या भाजपचे २००हून अधिक आमदार निवडून आणण्याचे उद्दीष्ट

Maharashtra Cabinet Expansion LIVE : भाजपमध्ये कोण कोणत्या नेत्यांना आले मंत्रिपदाचे फोन

चंद्रशेखर बावनकुळे

नितेश राणे

शिवेंद्रराजे भोसले

चंद्रकांत पाटील

पंकज भोयर

मंगलप्रभात लोढा

गिरीश महाजन

जयकुमार रावल

पंकजा मुंडे

राधाकृष्ण विखे पाटील

गणेश नाईक

मेघना बोर्डीकर

अतुल सावे

शिवसेनेला मिळाली खाती

नगरविकास

गृहनिर्माण

उद्योग

पर्यटन

आरोग्य

सार्वजनिक बांधकाम,( सार्वजनिक उपक्रम वगळून )

शालेय शिक्षण

पाणी पुरवठा आणि स्वच्छता

जल संधरण

मराठी भाषा

खनिकर्म

माजी सैनिक कल्याण

Maharashtra Cabinet Expansion LIVE : भाजपचे नेते अतुल सावे यांना देखील मंत्रीपदाच्या शपथ साठी फोन.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आल्याची माहिती. देवेंद्र फडणवीस जे खात देतील त्या खात्यावर काम करायला आवडेल अतुल सावे यांची प्रतिक्रिया

पक्ष आज खूप मोठी जबाबदारी देत आहे.मला आज फोन आलेला आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पूर्णपणे पार पडेल. मला याचा आनंद आहे आता खातो कोणतं नेमकं भेटतं ते पाहणं महत्त्वाचं आहे पण नक्कीच जे खातं भेटेल त्या खात्या संदर्भातील प्रश्न मी सभागृहात मांडेल.
माधुरी मिसाळ, भाजप आमदार

Maharashtra Cabinet Expansion LIVE : चंद्रशेखर बावनकुळे मंत्रिपदाची शपथ घेणार, महत्त्वाच्या खात्यावर वर्णी

Maharashtra Cabinet Expansion LIVE : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून भाजपचे अतुल सावे आणि शिवसेनेचे संजय शिरसाट यांना फोन आलेला आहे.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : राजभवनातील हालचालींना वेग

मंत्रीमंडळ विस्तारासाठी अवघे काही तास शिल्लक असताना राजभवनातील हालचालींना वेग आला आहे. राजभवनात विद्युत रोषणाई करण्यात आली असून आसन व्यवस्था सुरू आहे. आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल

Maharashtra Cabinet Expansion LIVE : आमदार भोयर यांना बावनकुळे यांचा फोन; मंत्रिपदी वर्णी

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony LIVE Updates : सलग तिसऱ्यांदा विजय मिळवणारे भाजप आमदार पंकज भोयर यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आल्याची माहिती आहे. आ. भोयर यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार असून राज्यमंत्री जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आमदार भोयर यांनी फोन आल्याचा दुजोरा दिला.

भाजपच्या मंत्रिपदाची यादी समोर, आतापर्यंत कोण कोणत्या नेत्यांना गेले फोन

नितेश राणे

शिवेंद्रराजे भोसले

चंद्रकांत पाटील

पंकज भोयर

मंगलप्रभात लोढा

गिरीश महाजन

जयकुमार रावल

पंकजा मुंडे

राधाकृष्ण विखे पाटील

गणेश नाईक

सायंकाळी 4 वाजता शपथविधी होणार आहे. मला फोन आलेला आहे. त्यामुळे मी नागपूरमध्ये पोहचलो. जे आमचे नेते देतील ते पद स्विकारायला तयार आहे. अधिवेशनात विरोधकांचा काम आहे घेरण्याचं. आमचं काम आहे उत्तर देण्याचं.Evm संदर्भात लोकसभेला त्यांना जे सुचलं नाही ते आता करताहेत.
भरत गोगावले, शिवसेना आमदार

नितेश राणे शिवेंद्रराजे भोसले चंद्रकांत पाटील पंकज भोयर मंगलप्रभात लोढा गिरीश महाजन जयकुमार रावल पंकजा मुंडे राधाकृष्ण विखे पाटील गणेश नाईकMaharashtra Cabinet Expansion LIVE : राष्ट्रवादीच्या ५ नेत्यांना शपथविधीसाठी फोन गेल्याची माहिती

अदिती तटकरे

हसन मुश्रीफ

बाबासाहेब पाटील

दत्ता भरणे

नरहरी झिरवळ

Maharashtra Cabinet Expansion LIVE : मेघना बोर्डीकर आणि पंकजा मुंडे यांचीही मंत्रिपदी वर्णी

pankaja Munde, Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony LIVE Updates : भाजप नेत्या पंकजा मुंडेंचाही मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. पंकजा मुंडे आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुंडे समर्थक नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : माधुरी मिसाळ यांना भाजपकडून मंत्रिपद

Maharashtra Cabinet Expansion LIVE :शिंदेगटाकडून 12 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन

उदय सांमत

प्रताप सरनाईक

शंभूराज देसाई

योगश कदम

आशिष जैस्वाल

भरत गोगावले

प्रकाश आबिटकर

दादा भूसे

गुलाबराव पाटील

Maharashtra Cabinet Expansion LIVE : मंत्रिपदासाठी भाजपकडून चंद्रकांत पाटील यांना फोन

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony LIVE Updates : मंत्रिपदासाठी भाजपकडून चंद्रकांत पाटील यांना भाजपकडून फोन आलाय. चंद्रकांत पाटील यांना कुठलं मंत्रिपद मिळणार याकडे तमाम पुणेकरांचे लक्ष लागलेय.

भाजपमधील वरिष्ठ नेते म्हणून चंद्रकांत पाटील यांची ओळख आहे. एक लाख मतांनी चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळाला होता. मागील महायुतीच्या काळात चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी होती.

Jaykumar Rawal News : जयकुमार रावल यांना मंत्रिपदासाठी फोन

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony LIVE Updates : सिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांचे मंत्रिपद निश्चित झालेय. भाजप कार्यलयातून रावल यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आलाय. ते सहकुटुंब शपथविधीसाठी नागपूरला रवाना होणार आहेत. आज दुपारी नागपूरमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : नितेश राणे मंत्री होणार, भाजप कार्यालयातून फोन

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony LIVE Updates : नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना मंत्रिपदासाठी भाजप कर्यालयातून फोन गेलाय. नितेश राणे यांना राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Cabinet Expansion LIVE : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मंत्री होणार, भाजपकडून शपथविधीसाठी फोन

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony LIVE Updates : सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी भाजप पक्षाचे फोन केला. अखेर भाजपचे मंत्री पदासाठी छत्रपती घराण्यातील वंशज शिवेंद्र राजे भोसले यांना पहिला फोन...भाजपा मंत्रिपदाच्या विस्तारात भाजप श्रेष्ठींचा पहिला फोन साताऱ्याचे आमदार छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवेंद्रराजे भोसले यांना.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Sable: 'डॉक्टर ते ॲक्टर' निलेश साबळेविषयी या गोष्टी कोणालाच माहित नाही

Beed: सामाजिक कार्यकर्त्याचा प्रताप; जिल्हा परिषदेच्या कार्यालयात गेला, महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करत...

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

SCROLL FOR NEXT