Shinde Saam
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकीमुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा, आनंदाचा शिधा बंद होणार, मंत्र्यानं सगळचं सांगून टाकलं

Mukhya Mantri Ladki Bahin Yojana Govt. Schemes: 'लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला आनंदाचा शिधा ही योजना देखील बंद होणार नाही', - मंत्री संजय शिरसाट.

Bhagyashree Kamble

राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली नाही. १५०० रूपयांचे २१०० रूपये होतील अशी आशा लाडक्या बहि‍णींना होती. पण सध्या लाडक्या बहि‍णींना १५०० रूपयांवरच समाधान मानावं लागेल. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होईल, असं विरोधकांनी म्हटलं. पण लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला आनंदाचा शिधा ही योजना देखील बंद होणार नाही, असं मंत्री संजय शिरसाट म्हणालेत.

विधानसभा निवडणूक झाली. महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुत्र हातात घेतली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले काही निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थगित केले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देखील बंद होणार, असं विरोधकांकडून सुर उमटत आहे.

यावर आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. काही या योजनेला विरोध करत आहेत. दुसरीकडे सरकारी तिजोरीवर बोजा वाढत आहे, असं सांगतात. पण यावर सरकार पर्याय काढत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू राहील. ही योजना बंद होणार नाही, असं शिरसाट म्हणालेत.

आनंदाचा शिधा बंद होणार नाही

आनंदाचा शिधा ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती. ही योजना बंद होणार नाही. सरकारच्या तिजोरीवरील बोजा वाढल्यावर काही योजना बंद कराव्या लागतात. मात्र, परिस्थिती सुधारल्यानंतर निधी वळवणार असल्याचं संजय शिरसाट म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update: नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000! हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

Marriage Line in Palmistry: लग्न कधी होणार, कसा मिळेल पार्टनर? हातावरील ही रेषा देते महत्त्वाचे संकेत!

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT