Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Marathi News Live Updates: मुसळधार पावसामुळे प्रवचनकार प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापूराण कार्यक्रमात भाविकांची तारांबळ

aharashtra Breaking News Live Updates : आज शुक्रवारी दिनांक २३ ऑगस्ट २०२४ देशातील राजकीय घडामोडी, बदलापूर अत्याचार प्रकरण, एमपीएसी विद्यार्थी आंदोलन सर्व अपडेट्स, राज्यातील पावसाचे अपडेट्स सर्व बातम्या एका क्लिकवर

Vishal Gangurde

Pradip Mishra : मुसळधार पावसामुळे प्रवचनकार प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापूराण कार्यक्रमात भाविकांची तारांबळ

नांदेड मध्ये आज पासून शिवमहापुरान कथेचे आयोजन करण्यात आले आहे.सात दिवस चकणारऱ्या या महाकथेत पहिल्याच दिवशी पावसाने खोडा घातला आहे.हा कार्यक्रम येकण्यासाठी आलेल्या हजारो भाविकांची पावसामुळे मोठी तारांबळ उडाली आहे.पाऊस एव्हढा मोठा होता मी वॉटरप्रूफ मंडपातून देखील पावसाचे पाणी आत आले.त्यामुळे हजेरो भाविकांना या पावसाचा फटका बसला.

Nashik Rain News :  त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस, गोदावरी नदीचं पाणी शिरलं शहरात

त्र्यंबकेश्वरमध्ये संध्याकाळी ७ वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरू असून मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी काठोकाठ भरून वाहात आहे. त्यामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील मेन रोड, तेली गल्लीसह अन्य काही भागात पाणी शिरलं आहे. बाजारपेठेतील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं आहे. त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मात्र पावसाचा फटका बसला असून भाविकांची तारांबळ उडाली.

Maharashtra Band : बंद मागे, तरीही पुण्यात उद्या मोठा पोलीस बंदोबस्त

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून उद्या शहरात विशेष गस्त असणार आहे.यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारीही तैनात असणार आहेत. महाराष्ट्र बंदची देण्यात आलेली हाक मागे घेतली असली तरी सुद्धा पुणे पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. पीएमपी बस आणि एस टी महामंडळच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा आज पोलिसांनी चर्चा केली आहे.

MHADA Housing : म्हाडाच्या रहिवाशांसाठी खूशखबर, इमारतींमध्ये लिफ्ट बसवणार

मुंबईतील म्हाडाच्या इमारतीतील रहिवाशांकरता खुश खबर आहे. म्हाडा इमारतीत आता लिफ्ट बसवल्या जाणार आहेत. मुंबई शहरातील पाच मजली म्हाडाच्या इमारतीमध्ये आता मुंबई महानगरपालिकेकडून लिफ्ट बसवण्यात येणार असल्याची माहिती, ⁠मंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे.

पुणे व्यापारी असोसिएशनचा महाविकास आघाडीच्या 

कोर्टाच्या आदेशानुसार पुणे व्यापारी असोसिएशनने उद्याचा संप मागे घेतला आहे. मात्र महाविकासआघाडीच्या बंदला पुणे व्यापारी असोसिएशन जाहीर पाठिंबा दिला आहे.

Alok Sharma : मराठी माणसाला बलात्कारी म्हटल्याप्रकरणी आलोक शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल

आलोक शर्मा यांच्यावर वांद्रे पोलीस ठाण्यात मराठी माणसाला बलात्कारी म्हटल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार राहूल कनाल थोड्याच वेळात वांद्रे पोलीस ठाण्यात पोहोचतील.

maharashtra band : महाराष्ट्र बंदवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदरच केला पाहिजे. याआधी देखील न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे निर्देश दिले होते की राजकीय पक्षांना अशा प्रकारचा बंद करता येणार नाही. ज्यांनी बंद पुकारला होता, आज न्यायालयाने अतिशय स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे त्यांनी जर तो बंद परत घेतला असेल तरी ही योग्य भूमिका आहे. कारण न्यायालयाचा सन्मान हा सर्वात महत्त्वाचा आहे.

Sharad Pawar : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शरद पवार उद्या आंबेडकर पुतळ्यासमोर मौन पाळणार

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शरद पवार उद्या सकाळी पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बसणार आहेत. एक तास बसून बदलापूर घटनेचा निषेध करणार आहेत.सकाळी 10 ते 11 पुतळ्यासमोर बसून वेदना व्यक्त करणार आहेत.

Maharashtra Band : उद्या बंद नाही, पण राज्यभर आंदोलन; नाना पटोले यांची कोर्टाच्या निर्णयानंतर पहिली प्रतिक्रिया

महाविकास आघाडीने बदलापूर घटनेच्या निषेधार्ध बंद पुकारला होता. त्याविरोधात याचिका दाखल झाल्यानंतर उच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर असून राज्य सरकारने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे महाविकास आघाडीने बंद मागे घेतला आहे, मात्र राज्यभर आंदोलन करणार असल्यांचं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.

Nar-Par Scheme : नार-पार योजनेसाठी गिरणा नदीपात्रात अर्धनग्न जलसमाधी आंदोलन

नार-पार योजनेसाठी गिरणा नदीपात्रात अर्धनग्न होऊन जलसमाधी आंदोलन सुरू आहे. जळगावच्या चाळीसगांव तालुक्यातील गिरणा नदीपात्रात हे आंदोलन सुरू आहे. नार पारची लढाई आता आरपार झाली आहे. गिरणा पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदीच्या पाणी पातळी वाढ होत आहे, मात्र मुसळधार पावसातही आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे.

Assembly Election 2024 : शिवसंग्राम विधानसभेच्या ५ जागा लढवणार, जरांगेंसोबत जाण्याची शक्यता

शिवसंग्रामच्या माध्यमातून आम्ही राज्यातील 5 विधानसभा मतदारसंघात तयारी करत आहोत. याबरोबरच शिवसंग्रामचे नेते स्वर्गीय विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणावर लढा उभारला तशाच पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे देखील लढा देत आहेत. त्यांनी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केल्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. शिवसंग्राम बीड विधानसभेसाठी तयारी करत आहे, हे त्यांच्या निदर्शनास आलेच असेल त्यामुळे या संदर्भात देखील त्यांच्याशी चर्चा करून आगामी वाटचाल निश्चित करण्यात येणार असल्याचे शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी म्हटले आहे.

High Court : आनंदाचा शिधा कंत्राट वाटपावरून कोर्टाने राज्य सरकारला झापलं

आनंदाचा शिधाच्या कंत्राट वाटपावरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापल

अनुभवी कंत्राटदाराने ६० कोटींची कमी बोली लावून देखील कंत्राट दुसऱ्याला देण्यात आल

एकीकडे उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत तर दुसरीकडे अशाप्रकारे ६० कोटी रुपयांनी वाढीव कंत्राट राज्य सरकार काढताय

कंत्राट वाटपात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा याचिकरत्यांचा आरोप

Pune News: मंकीपॉक्समुळे खबरदारी, पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्यांची तपासणी 

पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू आहे. आफ्रिकेसह इतर देशांमध्ये मंकीपॉक्सचा वेगाने प्रसार सुरू असल्याने खबरदारी घेतली जात आहे. विमानतळावर थर्मल स्कॅनरच्या सहाय्याने प्रवाशांचा ताप तपासला जात आहे.

Mumbai News: आरे जंगलात अवैधपणे डेब्रिज डम्पिंग सुरू, 15 जणांना अटक

आरे जंगलात मोठ्या प्रमाणात अवैधपणे डेब्रिज डम्पिंग सुरू आहे. अवैधपणे डेब्रिज डंपिंग करणाऱ्यांविरोधात आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरे पोलिसांकडून 15 जणांना अटक केली. आठ डंपरवर जप्तीची कारवाई केली.

Badlapur Case: बदलापूरच्या शाळेत फॉरेन्सिक टीम आणि क्राईम ब्रँचची टीम दाखल

बदलापूरच्या शाळेत फॉरेन्सिक टीम आणि क्राईम ब्रँचची टीम दाखल झाली आहे. दोन्ही टीमकडून घटनास्थळाचा तपास केला जाणार आहे. तर शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापिका यांचीही चौकशी सुरू आहे.

Mumbai News: राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतची याचिका 1 ऑक्टोबरपर्यंत तहकूब

राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतची याचिका 1 ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. पुढील सुनावणीपर्यंत नियुक्त्या न करण्याचे निर्देश देण्याची याचिकाकर्त्यांकडून कोर्टाकडे विनंती केली आहे. 'ज्या नियुक्त्या दोन वर्षात झाल्या नाहीत त्या काही लगेच होणार नाहीत", मुख्य न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना दिलासा दिलाय.

Kalyan News: महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक

24 ऑगस्टच्या बंदच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होत आहे. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते बैठकीत सहभागी झाले आहेत. बंदमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष शहरातील विविध संघटना , रिक्षा संघटना, ज्वेलर्स संघटना आणि दुकान संघटना, शाळा देखील सहभागी होणार आहे.

Nandurbar News: नंदुरबारमध्ये स्टेट बँकेच्या शाखेत महिलांची चेंगराचेंगरी, २ महिलांना भोवळ

नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव स्टेट बँक शाखेत महिलांची चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत 2 महिला बेशुद्ध पडल्या. ई केवायसीसाठी आदिवासी महिलांची सकाळपासून बँकांसमोर तुफान गर्दी झाली आहे.

Dombivali News:  डोंबिवलीमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग, आरोपीला अटक 

दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला डोंबिवली मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवली मधील सांगाव परिसरात 12 वर्षीय मुली रस्त्यावरून जात असताना या मुलींना पाहून आरोपी प्रवीण पाटील अश्लील हावभाव केले होते. काही दिवसांपूर्वी ही संतापजनक घटना घडली होती.

Nandurbar News : नदीपात्रात मृतदेह आढळला विवाहितेचा मृतदेह, नंदुरबारमध्ये खळबळ

तीन दिवसांपासून घरी न परतलेल्या विवाहितेचा पांझरा नदीपात्रामध्ये मृतदेह आढळून आला आहे, कोमल नितीन आघाव वय 24 या विवाहितेचा मृतदेह पिंपळनेर येथील पांझरा नदीत आढळून आला आहे, या विवाहितेने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे,

Crime News : अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला डोंबिवली मानपाडा पोलिसांनी केली अटक केली आहे. प्रवीण पाटील असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीने डोंबिवली सांगाव परिसरात 12 वर्षीय मुलींना बघून केले होते अश्लील हावभाव केले होते. यानंतर आरोपी फरार झालेला होता.

Sharad Pawar Security : शरद पवारांची सुरक्षा देशासाठी महत्त्वाची : मंत्री शंभुराज देसाई

शरद पवार हे मोठे राष्ट्रीय नेते आहेत. केंद्रातील यंत्रणाकडे काही माहिती आली असेल त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाचा दृष्टीने त्यांना सुरक्षितेची काळजी आहे. त्यामुळेच काळजी पोटी हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने दिलेली सुरक्षा आणखी वाढवावी लागलाय तरी वाढवली जाईल, असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.

Mumbai News : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं 

रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही शेतकऱ्यांनी गिरगाव चौपाटीजवळ आंदोलन आंदोलन केलंय. कर्जमुक्ती, पीकविमा , सोयाबीन कापूस दरवाढ यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा इशारा दिला होता.

Navi Delhi : दिल्लीहून राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे पथक बदलापूरसाठी रवाना

दिल्लीहून राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे पथक बदलापूरसाठी रवाना झालेय. राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे सचिव सदस्य रूपाली बॅनर्जी सिंग आणि सल्लागार कातायानी आनंद बदलापूरला रवाना झाले आहेत. बदलापूर बाल अत्याचार प्रकरणात पोलीस ठाणे, शाळा प्रशासन यांची आयोग चौकशी करणार आहे. पीडितेच्या पालकांची देखील आयोगाचे पदाधिकारी भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय.

Amravati News : अमरावती जिल्ह्यात हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

अमरावती जिल्ह्यात सततच्या पावसामुळे हजारो हेक्टर शेतजमिनी पाण्याखाली आल्या आहेत. दर्यापूर तालुक्यात तर कपाशी,तूर व सोयाबीन पिकाच्या शेतात दोन ते तीन फूट पाणी साचलं असून शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. संपूर्ण पिके हे पाण्याने खराब झालेली आहे,दरम्यान दर्यापूर मध्ये नुकसान झालेल्या शेतात अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी जाऊन पाहणी करत नुकसानीचा आढावा घेतला आहे.

Latur News : कोलकत्ता आणि बदलापूर येथील अत्याचाराच्या विरोधात लातूरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा

कोलकत्ता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या केली. याविरोधात आणि बदलापूर येथे दोन चिमूरड्यांवरील अत्याचाराविरोधात आज लातूरच्या दयानंद कॉलेजचे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हातात बॅनर धरत मूक मोर्चा काढला आहे. यावेळी मुलींचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळला 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह 

छत्रपती संभाजी नगर शहरातील सलीम अली सरोवरमध्ये 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळलाय. अपूर्वा दिलीप गजहंस असं तरुणीचं नाव आहे. अपूर्वा ही पडेगाव भागातील मीरा नगर येथे राहत होती. ती संगमनेर येथील मेडिकल कॉलेजमध्ये BHMS च शिक्षण घेत होती. प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत चोरट्यांचा सुळसुळाट, सीवूडमधील घटना cctvत कैद 

नवी मुंबईतील सिवूड सेक्टर 48 भागात रात्रीच्या वेळी चोरांचा मुक्त वावर पाहायला मिळतोय. चोरीच्या उद्येश्याने आलेले दोघे चोरटे सिसीटीव्ही मध्ये कैद झालेत. इमारतीमधील सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांनी परिसरातून धूम ठोकलीय. या घटनेमुळे एनआरआय पोलीसांनी सिवूड परिसरात पेट्रोलिंग वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येतेय.

Ulhasnagar News : महाराष्ट्र बंदला महायुतीतल्या आरपीआय आठवले गटाचा पाठिंबा

बदलापुरात दोन चिमुकल्यांच्या सोबत झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आलीय. महाविकास आघाडीकडून हा बंद केला जाणार आहे. मात्र, या बंदला महायुतीकडून टिका होत असताना चक्क महायुतीतील आरपीआय आठवले गटांने पाठिंबा दिला आहे. जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी या बंदमध्ये सहभागी होत आरपीआय आठवले गट बदलापुरातील घटनेचा तीव्र निषेध करेल असे सांगितलंय.

Kolhapur News : कोल्हापूर बंद; हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यास सुरुवात

कोल्हापूर बंदच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यास सुरुवात झालीय. कोल्हापूर जिल्हा बाहेरून येणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. छत्रपती शिवाजी चौक परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप आलेय.

Badlapur News : बदलापूर रेल रोको प्रकरण ; 9 आंदोलनकर्त्यांना  अटक

बदलापूर रेल रोको प्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी ९ आंदोलनकर्त्यांना अटक केलीय. थोड्याच वेळात त्यांना कल्याण रेल्वे कोर्टात हजर करणार आहेत. बदलापूर अत्याचाराच्या विरोधात रेल रोको आंदोलन करणाऱ्या ३०० आंदोलन कर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

Nashik News : नाशिकच्या महाविद्यालयात प्राचार्यांसमोर विद्यार्थ्यांची   हाणामारी, पोलिसांत गुन्हा दाखल 

सध्या राज्यभर शाळा महाविद्यालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नाशिकच्या महाविद्यालयात चक्क प्राचार्यांच्या कार्यालयातच विद्यार्थ्यांची मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीत प्राचार्यांना देखील दुखापत झाली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Buldhana News : मुसळधार पावसाने दिवठणा लघु प्रकल्पाच्या भिंतीला भगदाड; शेकडो एकर शेतीतील पीक धोक्यात 

बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून बरसत असलेल्या पावसाने अनेक लहान प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. तर खामगाव तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील देवठाणा शिवारात असलेल्या एका लघु प्रकल्पाला भगदाड पडल्याने शेकडो एकर शेतीतील पीक धोक्यात आला आहे. खामगाव तालुक्यातीलच बोरजवळा लघु प्रकल्पाचा सांडवा ही ओव्हर फ्लो झाल्याने काही वेळानंतर खामगाव बोरजवळा मार्गही बंद पडण्याच्या परिस्थितीत आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने सध्या मात्र विश्रांती घेतली आहे.

Maharashtra Politics : महायुती सरकारला मोठा धक्का; २२६५ कोटींच्या कर्ज वितरणास मुंबई उच्च न्यायालयाची मनाई

महायुती सरकारला मोठा धक्का बसला आहे. सत्ताधाऱ्यांच्या १७ साखर कारखान्यांना दिलेल्या २२६५ कोटींच्या कर्ज वितरणास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधाऱ्यांच्या १७ साखर कारखान्यांना शासन हमीवर सुमारे २२६५ कोटी रुपयांचे खेळत्या भागभांडवलासाठी मार्जिन मनी लोन उपलब्ध देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हाच निर्णय वादात सापडला आहे.

uttarakhand landslide : उत्तराखंडला मुसळधार पावसाने झोडपलं, भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू

उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे या भागात मध्यरात्री भूस्खलनाची घटना घडली. यात 4 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व नेपाळी नागरिक आहेत. ते मजुरीचे काम करत होते.

paldhag dam overflow : बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभ्यारण्यातील पलढग धरण ओहरफ्लो

बुलढाण्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात 50 टक्केच पाऊस झाला.

आता पावसाळ्याचा शेवटचा महिना सुरु होत आहे.

अद्याप पर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस न झाल्याने सर्व धरणे कोरडेच

ज्ञानगंगा अभयारण्यातील एकमेव पलंढग धरण यावर्षी ओहरफ्लो

Buldhana Rain Update :  बुलढाण्यात मुसळधार पाऊस, बळीराजा सुखावला 

बुलढाण्याच्या अनेक तालुक्यात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

मध्यरात्रीपासून अनेक भागात मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला.

काही भागात जोरदार पावसाने शेतात तुंबल पावसाचं पाणी, काही भागात शेतीच नुकसान.

Ghatkopar News : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : संशयित अर्शद खानविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी संशयित अर्शद खानविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे.

अर्शद खानचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज सत्र न्यायालयाने होता फेटाळला

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेच्या कंपनीकडून अर्शद खानला पैसे मिळाल्याचा आहे गुन्हे शाखेला संशय

होर्डिंग दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू तर ७० हून अधिक लोक झाले होते जखमी.

Kolhapur Band : हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज कोल्हापूर बंदची हाक

हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज शुक्रवारी कोल्हापूर बंदची हाक

संपूर्ण शहरभरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त

शहरातील अनेक रस्त्यांवर शुकशुकाट तर दुकान बंद आहेत.

बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचार निषेधार्थ हिंदुत्ववाद्यांचा आज कोल्हापूर बंद

Mumbai Crime News : मुंबईत पित्यानेच केली मुलाची विक्री

मुंबईत पित्यानेच मुलाची विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पत्नीच्या मृत्यूच्या अवघ्या काही दिवसात दोन वर्षीय मुलाची केली विक्री

अँटॉप हिलच्या विजयनगर येथील धक्कादायक प्रकार

उत्तर प्रदेशातील दाम्पत्याला केली मुलाची विक्री

Maharashtra Politics : अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी गुरुवारी रात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली. अंतरवाली सराटीत दोघांमध्ये चर्चा झाली आहे. राजू नवघरे हे हिंगोली जिल्हयातील वसमतचे आमदार आहेत. दोघांमध्ये मराठा आरक्षणावर चर्चा झाली आहे. अजित पवार गटाच्या आमदाराने अचानक रात्री मनोज जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT