Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Marathi News Live Updates: यंदाच्या मौसमातील गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर

Maharashtra Breaking News Live Updates : आज शनिवारी दिनांक २४ ऑगस्ट २०२४ बदलापूर अत्याचार प्रकरण, देशातील राजकीय घडामोडी, एमपीएसी विद्यार्थी आंदोलन सर्व अपडेट्स, राज्यातील पावसाचे अपडेट्स सर्व बातम्या एका क्लिकवर

Vishal Gangurde

Nashik Godavari: यंदाच्या मौसमातील गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर

नाशिक यंदाच्या मौसमातील गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर आला आहे नाशिक शहर व जिल्ह्यात पावसाची संतदार सुरू आहे त्यामुळे गंगापूर दराने 84 टक्के भरले आहे त्यामुळे गंगापूर धरणातून 7000 क्यूसे इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात येत आहे त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे रामकुंड परिसरात असलेल्या छोटे मोठे मंदिर पुराच्या पाण्यात गेले आहे तर येत्या 48 तासात हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मुंबईत 7 जागांवर दावा

महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून लवकरच मुंबईतील जागांचा प्रस्ताव ठेवण्यात येणार

या जांगासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे.

मुंबादेवी, भायखळा, अनुशक्ती नगर, चेंबूर, मानखुर्द- शिवाजीनगर, वांद्रे पूर्व आणि विक्रोळी

संभाव्य उमेदवार

भायखळा- समीर भुजबळ

अणुशक्ती नगर- सना मलिक

मानखुर्द शिवाजीनगर- नवाब मलिक, वांद्रे पूर्व- झिशान सिद्धकी

चेंबूर- सिद्धार्थ कांबळे

विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची घोषणा

पुलवामा जिल्ह्यात निवडणूक लढवण्यासाठी 3 उमेदवारांच्या नावाची घोषणा केलीय.

त्राल - मोहम्मद युसूफ हझम

पुलवामा - इश्तियाक अहमद शेख

राजपुरा - अरुण कुमार रैना

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक लढवत आहे. पुढच्या टप्प्यातील बाकी उमेदवारांची नाव लवकरच जाहीर केले जाणार आहेत.

अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपुल घाटामध्ये दरड कोसळली

अहमदनगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील पांढरीपुल घाटामध्ये दर कोसळली आहे. सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळली असली तरी कोणतीही हानी नाही.बांधकाम विभागाकडून दरड हटवण्याचे काम सुरू आहे. घाटामधून प्रवास करताना लक्ष देऊन प्रवास करावा प्रशासनाचे प्रवाशांना आवाहन आहे.

Khadakwasla: पुण्यातील खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला 

खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला २३ हजार ज्युसेकने वाढला आहे. पुण्यातील डेक्कन जवळ असलेला भिडे पूल पाण्याखाली गेलाय. नदीपात्रातील दोन्ही बाजूचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालीय.

रत्नागिरी - राजापूर जवळच्या अणुस्कुरा घाटातील वाहतूक अद्यापही ठप्पच

अणुस्कुरा  घाटात कोसळलेली दरड हटविण्याचे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहेत.

दरडीत मोठे दगड, तसेच पावसामुळे दरड हटविण्यात अडथळे

पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारा महत्त्वाचा घाट म्हणून अणुस्कुरा घाटाची ओळख आहे.

नंदुरबार जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस; देवगोई घाटात कोसळली दरड

नंदुरबार जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस होत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई घाटात दरड कोसळल्याची घटना घडलीय. देवगोई घाटात वळण रस्त्यावर कोसळलेल्या दरडीमुळे वाहतूक बंद झालीय.

NCP SP : भगिरथ भालके लवकरच करणार शरद पवार गटात प्रवेश

भगीरथ भालके शरद पवार गटातून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात भालके यांनी शरद पवारांची भेट घेतली. महाविकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळावी,यासाठी त्यांनी त्यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.

Pune Rain: पुणे जिल्ह्यात 24 आणि 25 ऑगस्ट रोजी रेड अलर्ट जारी

पुणे जिल्ह्यातील घाट माथा आणि काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात आले असुन त्यात वाढ होण्याची श्यक्यता आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Nagpur : नागपूरातील संविधान चौकात कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन

राज्यात ४० हजार कंत्राटी वीज कर्मचारी, त्यांच्यासाठी हरियाणा पॅटर्न लागू करावा. कंत्राटदार कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे खातं असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे कंत्राटीपद्धत बंद करुन शास्वत रोजगार देण्याची मागणी करण्यात आलीय. कंत्राटी वीज कर्मच्यांच्या वेतनवाढीची मागणी या कर्मचाऱ्यांनी केलीय. नागपूरातील संविधान चौकात त्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे.

धुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस; भात नदीला पूर, गावांचा तुटला संपर्क

धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कारण कायम आहे आणि यामुळे नदी नाले ओसांडून वाहू लागले आहेत. धुळे तालुक्यातील भात नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे तालुक्यातील तिसगाव ढंडाणे येथील फरशी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे, नदीला आलेल्या पुरामुळे हा फरशी पूल संपूर्णतः पाण्याखाली गेल्यामुळे जवळपास सात ते आठ गावांचा संपर्क देखील तुटला आहे.

Nashik Rain: मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ

रामकुंड परिसरातील अनेक मंदिरांना पुन्हा एकदा पाण्याने वेढा मारलाय. गंगापूर धरणातून 2 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सुरू आहे. पाऊस सुरू राहिल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला जाईल प्रशासनाची माहिती आहे. दारणा धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी आणि दारणा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Rain News: संभाजीनगर जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; कन्नड तालुक्यातील अंजना नदीला पूर

संभाजीनगर जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून पावसाची जोरदार हजेरी सुरुय. सोयगाव तालुक्यातल्या कालदरी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने डोंगर भागातील नाल्यांना पूर आला आणि त्यामुळे शेतात असणारा बांध फुटला आणि मक्का पिकांच्या शेतातून पाणी वाहू लागले. शेतातही पाणी घुसल्याने शेतांनाही नदीच स्वरूप आलय. तर दुसरीकडे कन्नड तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे चापानेर,देवपूळ परिसरातील तलाव ओव्हर फुल झाल्याने अंजना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय. यावेळी पुलावरून पाणी वाहत असल्याने शेतकऱ्यांना थांबावं लागलं होत. दरम्यान जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिके ही आडवी झाल्याने मोठं नुकसान झाले.

Navnath hake : गरीब मराठा उमेदवाराला पाठिंबा देऊ - नवनाथ हाके

'मनोज जरांगेंनी गरीब मराठ्यांना लोकसभेला सपोर्ट केला नाही, त्यांनी पैसे घेऊन श्रीमंत मराठ्यांना मदत केली. जर गरीब मराठा उभा राहिला तर त्याला आम्ही पाठिंबा देऊ, असे नवनाथ हाके म्हणाले.

Pune Helicopter Crash: पुण्यातील पौंडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं

पुणे जिल्ह्यातील पौंडजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

Yavatmal News: यवतमाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेत गोंधळ

यवतमाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना महिलांनी गोंधळ घातला.

PM Narendra Modi Jalgaon Visit: PM मोदी जळगाव दौऱ्यावर,  लखपती दीदी कार्यक्रमाला लावणार उपस्थिती

नरेंद्र मोदी उद्या 25 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. जळगावच्या विमानतळा समोर शंभर एकर जागेमध्ये नरेंद्र मोदी यांच्या लखपती दीदी कार्यक्रमाची जयत अशी तयारी केली जात आहे. या कार्यक्रमाला जवळपास एक ते दीड लाख बचत गटाचा महिलांची उपस्थिती राहणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कार्यक्रम ठिकाणी तयारी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व अडचणींना मात करून युद्ध पातळीवर प्रशासनाकडून तयारी सुरू असून कार्यक्रम 100% यशस्वी होईल असा विश्वास गिरीश महाजन आणि व्यक्त केला आहे.

Kalyan Protest News: कल्याणमध्ये भाजपकडून जाणीव जागर आंदोलन

पश्चिम बंगाल ,बदलापूर सह देशाच्या इतर भागात घडलेल्या महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा भाजपने जाणीव जागर आंदोलन करत निषेध केला .कल्याण पूर्वेकडील डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राबाहेर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भर पावसात

मौन बाळगत आंदोलन केले. यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेबद्दल चीड आहे या घटनेचा निषेध करतो ,सरकारकडून महिलांच्या सक्षमीकरण साठी विविध योजना राबवल्या आहेत ,भाजप नारी शक्तीचा सन्मान करते नारी शक्ती सोबत आहेत ,महिला वरील होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनाचा भाजप निषेध करत असल्याचे सांगितले .

Nalasopara Crime News: नालासोपाऱ्यात दोन गटात राडा, एकाचा मृत्यू 

शुक्रवारी रात्री नालासोपाऱ्यात दोन गटात तुफान हाणामारी झाली.या हाणामारीत एकाच दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना गंभीर दुखापत झाल्याने प्रकृती चिंताजनक आहे. या मारहाणीत आकाश पाल याचा जागीच मृत्यू झाला आहे तर शुभम ठाकूर आणि सलीम यांच्यासह ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.यातील दोघांना कांदिवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर ( शताब्दी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अन्य दोघांना वसईतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

Jalna News: जालन्यात स्टील कंपनीत स्फोट, १५ जण जखमी

जालना औद्योगिक वसाहती मधील गजकेसरी स्टील कंपनीमध्ये विस्फोट, 15 जखमी 3 गंभीर. स्टील कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये विस्फोट झाल्याने वितळलेले लोखंड अंगावर पडुन 15 जण जखमी. शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू

Dhule News:  धुळ्यात पोलीस अधिकाऱ्यांतर्फे शाळांची पाहणी

बदलापूर येथील शाळेत झालेल्या बाल अत्याचाराच्या घटनेनंतर आता संपूर्ण राज्यामध्ये मुलींच्या शाळेमधील सुरक्षेचा प्रश्न समोर आलेला आहे, आणि याच पार्श्वभूमीवर धुळे शहरात देखील याची खबरदारी घेतली जात आहे, पोलीस प्रशासनातर्फे आता धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील सर्व शाळांमध्ये पोलीस अधिकार्यांतर्फे पोहोचून स्वतः मुलींच्या सुरक्षेची पाहणी केली जात आहे,

Ambegaon News: ऊसतोडणी आणि वाहतुकीच्या नावावर पैसे उकळणारा आरोपी चार वर्षानंतर अटक

आंबेगाव तालुक्यातील ऊस तोडणीसाठी मजुर आणि वाहतुकीसाठी गाड्या पुरविण्याचे आश्वासन देऊन स्थानिक मुकादमांची लाखो रुपयांची फसवणुक करणा-या आरोपीला पारगाव पोलीसांनी अटक केली आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथे अनेक स्थानिक ऊसतोड मुकादम यांचे लाखो रुपये उकळून चार वर्षापासुन फरार झालेल्या भीमा पवार या आरोपीला पारगाव पोलिसांनी अटक केली आहे,गेली चार वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता अखेर त्याला अटक करण्यात आली आहे

Chhatrapati Sambhajinagar Rain: छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा हाहाकार, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बहुतांशी ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी कपाशीसह इतर पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय .शिवाय काही ठिकाणी मक्का हे उभ पीक आडव झाल्याने शेतकरी हवाल दिलं झाला. कन्नड तालुक्यातील चापानेर परीसरात वादळी वाऱ्यासह झलेल्या पावसामुळे मका पिकाच मोठ नुकसान झालं. दरम्यान झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करत आहे.

Badlapur School Case News: बदलापूर अत्याचार प्रकरण: अफवा पसरवणाऱ्या चार जणांवर गुन्हा

बदलापूर अत्याचार प्रकरणी अफवा पसरवणाऱ्या आणखी चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इंस्टाग्राम आयडीवर व्हायरल पोस्ट करत पीडित कुटुंबियांच्याबाबत अफवा पसरवली होती. या अफवा पसरणाऱ्या एकूण 5 जणांवर गुन्हे दाखल

Kalyan- Dombivli Rain: कल्याण डोंबिवलीत पावसाला सुरुवात

नेक दिवसांच्या विश्रांतीनंतर कल्याण डोंबिवली मध्ये काल मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली होती . काहीशी विश्रांती घेत अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या . आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली होती मात्र दुपारनंतर कल्याण डोंबिवलीत पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली जवळपास अर्धा ते पाऊण तास कल्याण डोंबिवलीत पाऊस सुरूच आहे पावसाला जोर नसला तरी अधून मधून पावसाची जोरदार सर कोसळते.

Mumbai News: महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक, जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार

महाविकास आघाडीची आज 4 वाजता महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. मुंबईतील जागांच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती. महाविकास आघाडीचे मुंबईतील नेते जागा वाटपावर आज या बैठकीत चर्चा करणार आहेत. मागील बैठकीत जागा वाटपावर बदलापूर घटनेमुळे चर्चा होऊ शकली नाही, मात्र आजच्या बैठकीत महाविकास आघाडीतील मुंबईतील नेते पुन्हा एकदा चर्चेला बसणार आहेत. संजय राऊत अनिल देसाई वर्षा गायकवाड राखी जाधव जितेंद्र आव्हाड नसीम खान व इतर महाविकास आघाडीतील मुंबईतील नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे

Dhule News: धुळ्यात पावसाचा जोर कायम

धुळे जिल्ह्याला आज यलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला असून, हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज धुळ्यात जोरदार पाऊस सुरू आहे, शहरासह जिल्हाभरात विविध ठिकाणी आज पावसाचा जोर बघावयास मिळत आहे, सलग दुसऱ्या दिवशी धुळे जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले असून, शहरातील नाल्यांना नदीचे स्वरूप आले आहे, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवनावर देखील त्याचा परिणाम झाला आहे, दोन दिवसांपासून होत असलेल्या या मुसळधार पावसामुळे जिल्हाभरातील जलसाठ्यांमधील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

Mumbai News: मविआच्या निषेधाला  भाजपचे उत्तर, मुंबईत ठिय्या आंदोलन

एकीकडे विरोधक बदलापूर घटनेनंतर रस्त्यावर उतरले आहेत. तर या विरोधकांच्या आंदोलनाला भाजप ने ही रस्त्यावर उतरत जागर जाणिवेचा आंदोलन सुरू केले आहे.भाजप नेते प्रसाद लाड यांनी सायन सर्कल येथील भाजप कार्यालय समोर ठिय्या दिला. हे आंदोलन नाही, तर जागर आहे, शरद पवार मेहबूब शेख वर कारवाई करणार का? लव्ह जिहाद प्रकरणात उद्भव ठाकरे गप्प का होते? असा सवाल या वेळी आमदार प्रसाद लाड यांनी विचारला आहे.

Mumbai News: मेट्रो विस्ताराच्या कामामुळे अंधेरीत भलामोठा खड्डा 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन च्या माध्यमातून अंधेरी पूर्व गुंदवली ते सहार विमानतळापर्यंत मेट्रो 7a विस्तार सुरू आहे. या मार्गावर टनेलिंग चे काम सुरू असतानाच अंधेरी पूर्व परिसरातील सहार पी एन टी कॉलनी येथे एक भला मोठा खड्डा पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या ठिकाणी लहान मुले आणि महिला उभ्या असताना हा खड्डा पडला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. साधारणपणे आठ मीटर खोल आणि तीन मीटर व्यासाचा खड्डा पडल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना आता मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून तात्पुरते हॉटेलमध्ये शिफ्ट केले आहे. सध्या मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून काँक्रीट टाकून हा खड्डा बुजवण्यात आला आहे 25 मिक्सर हा खड्डा भरण्यासाठी लागले आहे.

Manoj Jarange Patil: '३० सप्टेंबरपर्यंत कर्जमाफी करा', मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला नवा अल्टीमेटम दिला आहे. 30 सप्टेंबरच्या आत शेतकऱ्याची कर्जमुक्ती करण्याची त्यांनी मागणी केली आहे. 30 सप्टेंबरच्या आत कस काय कर्जमाफी करत नाही बघतोच असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय. सरकारनं 30 सप्टेंबरच्या आत कर्जमुक्तीच करायची कायमची, पिकविमे सगळे द्यायचे,अनुदान सुद्धा सगळे द्यायचे. शेतकऱ्याच्या पिकाला भाव कसा मिळत नाही आम्ही बघतो 30 सप्टेंबरच्या नंतर असं देखील मनोज जरांगे म्हणालेत..

Maval News: मावळात मुसळधार पाऊस, बळीराजा सुखावला

मावळात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती, त्यामुळे वातावरणात दमट हवा निर्माण होऊन उष्णता वाढली होती मात्र रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे थंडावा निर्माण झाला असून या पावसाने मात्र जनजीवन विस्कळीत झाले आहे, परंतु शेतीसाठी समाधानकारक पाऊस असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वारे वाहू लागले आहे तर मावळातील अनेक धरणे शंभर टक्के भरली आहेत..

Yavatmal News: यवतमाळमध्ये मविआचे भरपावसात आंदोलन

बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने यवतमाळच्या बस स्थानक चौकात निदर्शने केली यावेळेस निदर्शने करत असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावली आणि पावसातच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी घोषणाबाजी केली. महाराष्ट्रात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात निषेध व्यक्त करीत सरकारवर टीका केली आणि या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली मात्र पाऊस सुरू असतानाही विरोधकांनी मागे हटले नाही आणि सरकारचं निषेध नोंदवला.

Nanded News: नांदेडमध्ये लाडक्या बहिणींचा संताप 

लाडकी बहीण योजनेचे पैसे अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले.परंतु अनेक महिलांचे बँकेत ekyc नसल्याने खात्यातील पैसे काढतात महिलांना बँकेच्या रांगेत तासनतास उभा राहावं लागतं आहे.शासनाने महिलांच्या खात्यात पैसे टाकले परंतु बँकेच्या आडकाठी धोरणामुळे पैसे काढताना या महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कामे सोडून बँके समोर रांगेत उभे राहावे लागत आहे.आशा संतप्त प्रतिक्रिया या लाभार्थी महिलांनी दिल्या.

Mumbai Dam Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणार वैतरणा धरण 100 टक्के भरलं

मुंबईला पाणीपुरवठा करणार वैतरणा धरण 100 टक्के भरलं

- कालपासून इगतपुरी आणि परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण ओव्हर फ्लो

- धरणातून 6 हजार 8400क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू

Mumbai News: बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मुंबईत राष्ट्रवादीचे आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रदेश कार्यालयासमोर मुक आंदोलन करण्यात येत आहे. बदलापूर घटनेतील आरोपीला लवकरात लवकर फाशी द्या अशी मागणी आंदोलकांची आहे. यासोबतच आंदोलकांच्या वतीने राज्य सरकारने शक्ती कायदा लागू केला असता तर बदलापूर सारखी घटना घडली नसती परंतु केवळ शक्ति कायद्याचं श्रेय महाविकासाकडे सरकारला मिळेल म्हणून केंद्र सरकार शक्ति कायदा लागू करत नाही अशा पद्धतीचा आरोप करण्यात आला आहे.

Sindhudurg : मुंबई गोवा महामार्गावर कंटेनरला दुचाकीची धडक ; 2 युवक जागीच ठार

मुंबई गोवा महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची धडक बसून दोन युवक जागीच ठार झाले. मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील वागदे येथे गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर उभा होता. मध्यरात्री अडिजच्या सुमारास कुडाळच्या दिशेने दुचाकी वरून जाणाऱ्या युवकांना कंटेनर न दिसल्याने दुचाकीची जोरदार धडक या कंटेनरला बसली यात कणकवली येथील दोन्ही युवक जागीच ठार झाले. हा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Sidhudurg News : अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती, मासेमारी ठप्प

अरबी समुद्रात वादळसदृश वातावरणामुळे मासेमारी ठप्प झाली आहे. त्यामुळे कोकणातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या देवगड बंदरात गुजरातसह तामिळनाडू आणि राज्यातील शेकडो बोटी देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. हवामान विभागाने वादळसदृश वातावरणामुळे समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये असा इशारा दिला आहे. खोल समुद्रातील मासेमारीला १ ऑगस्टपासून सुरूवात झाली. नारळीपौर्णिमेच्या मुहूर्तावर समुद्रातील मासेमारीला खऱ्या अथनि सुरूवात केली आणि मासेमारी बंदर गजबजू लागली होती. मात्र अचानक दक्षिण वारा सुरू झाल्याने समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने मासेमारी ठप्प झाली आहे.

Pune News : पुण्यात भाजपचं मूक निषेध आंदोलन

बदलापूरमधील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद करण्याचा महाविकास आघाडीचा कुटील डाव उच्च न्यायालयाच्या आदेशाने हाणून पाडला. तरीही आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या प्रकरणाचे राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे. महाआघाडीचा ढोंगीपणा नागरिकांसमोर आणण्यासाठी पुणे शहर भाजपच्या वतीने महविकास आघाडीच्या विरोधात मूक निषेध आंदोलन करत असल्याचं समोर आलंय.

Ahemdnagar News : मुसळधार पावसामुळे नगर कल्याण महामार्ग बंद

अहमदनगर शहरामध्ये रात्री तब्बल चार तास मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला देखील पूर आला असून पाऊस थांबल्यानंतर तब्बल आठ तासानंतरही पुराचे पाणी ओसरलेलं नाही महानगरपालिकेने सीना नदीच्या पुरामुळे काही नुकसान होऊ नये किंवा कुठली दुर्घटना घडू नये यासाठी पहाटेपासून खबरदारी घेतली आहे

Nashik News : नाशिकमध्ये हिट अँड रनची घटना

नाशिकमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. मध्यधुंद कार चालकानी उभे असलेल्या तिन गाड्यांना धडक दिलीय. अपघातात दोन चारचाकीसह एक दुचाकीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मद्यधुंद अवसतेत गाडी चालवणारा आणि अपघात करणारा व्यक्ती समाज कल्याण अधीक्षक आहे.

Nagpur News : महाविकास आघाडीकडून बदलापूर विरोधात नागपुरात मूक आंदोलन

महाविकास आघाडीकडून बदलापूर विरोधात नागपुरात मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व्हेरायटी चौकात डोक्याला आणि काहींनी तोंडाला काळी पट्टी बांधून महिला अत्याचार घटनेचा निषेध नोंदवला.

Mumbai News : मध्य रेल्वे लोकल सेवा दहा ते पंधरा मिनिटे उशिराने

मध्य रेल्वे लोकल सेवा दहा ते पंधरा मिनिटे उशिराने सुरू आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं समोर आलंय.

Badlapur News : बदलापूर ते अंबरनाथ रेल्वे वाहतूक बंद 

बदलापूर ते अंबरनाथ रेल्वे वाहतूक बंद तब्बल तासाभरापासून बंद आहे. प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

Buldhana News : बुलढाण्यात कार्यक्रमाला येत असताना न्यायाधिशाचा मृत्यू

बुलढाणा येथील कार्यक्रमाला येत असताना न्यायाधिशाचा मृत्यू झालाय. हृदयविकाराच्या झटका आल्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

Kolhapur News : इंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापुरातील बिंदू चौक परिसरात मुक आंदोलन 

इंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापुरातील बिंदू चौक परिसरात मुक आंदोलन सुर आहे. आंदोलनात काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उपनेते संजय पवार, विजय देवणे यांच्यासह इंडिया आघाडीतील विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते सहभागी झालेत.

Kolhapur News : कोल्हापूरमध्ये भररस्त्यात मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला नागरिकांनी चोपले 

कोल्हापूर जिल्ह्यात भररस्त्यात मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला नागरिकांनी चोपलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलं एमआयडीसीजवळ ही घटना घडली. छेड काढत असताना नागरिकांनी तरुणाला पकडून बदडले . कागल एमआयडीसीमधील चार दिवसापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Ratnagiri News : रत्नागिरी- राजापूर जवळचा अणुस्कुरा घाटात कोसळली दरड

रत्नागिरी- राजापूर जवळचा अणुस्कुरा घाटात दरड कोसळली. बांधकाम विभागाच्या माध्यमातून जेसीबी लावून दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. अनुस्कुरा घाटातील दरड दूर करण्यासाठी आणखी दोन तास लागणार असल्याची माहिती मिळतेय. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली होती.

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत ७ जागांसाठी आग्रही

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत ७ जागांसाठी आग्रही असल्याची माहिती मिळतेय. महाविकास आघाडीकडे ७ जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. घाटकोपर पूर्व, कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्ती नगर, मलबार हिल हे विधानसभा मतदारसंघ लढण्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष इच्छुक असल्याचं समोर आलंय.

Nagpur News : लोकसभेत रामटेकमधील पराभवानंतर विधानसभेसाठी भाजपची मोर्चेबांधणी

लोकसभेत रामटेक मधील पराभवानंतर विधानसभेसाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू झालीय. पराभव विसरून जनतेत जाऊन विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या भाजप पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि नागपूर जिल्ह्याचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी भाजप ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

-

Beed News : बीड जिल्ह्यात संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

बीड जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी सुरू केली आहे. तर काल मध्यरात्रीपासून बीड जिल्ह्यात जोरदार व मध्यम स्वरूपाचा संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील कोरड्याठाक असणाऱ्या नद्या देखील आता दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. जिल्ह्यातील बीड, वडवणी, माजलगाव, परळी, केज, अंबाजोगाई, गेवराई, पाटोदा, आष्टी यासह सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार एंट्री केल्याने शेतकरी सुखावला आहे.

Mumbai News : राज्यात आज ठीक ठिकाणी आंदोलनाची हाक

राज्यात आज ठीक ठिकाणी आंदोलनाची हाक देण्यात आलीय. वरळीत ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचं आंदोलन होणार आहे. तोंडाला काळी फित बांधून आंदोलन करणार असल्याची माहिती मिळतेय. तर शिवसेना भवन येथे स्वतः उध्दव ठाकरे आंदोलन करणार आहेत. बदलापूर आणि राज्यात वाढत असलेल्या महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ मविआ आक्रमक झाल्याचं दिसतंय.

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात तुफान पाऊस, नद्यांना पूर 

नंदुरबार जिल्ह्यात तुफान पाऊस सुरू आहे. पहाटेपासून पावसाची संततधार सुरू असल्याचं समोर येतंय. नंदुरबार शहरासह धडगाव तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पहाटे पासून होत असलेल्या पावसामुळे धडगाव तालुक्यातील नद्यांना पूर आलाय. मुसळधार पावसामुळे धडगाव तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झालाय.

Satara Accident :  आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनाचा अपघात

आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनाची एका दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. साताऱ्यातील बिदाल जवळील शेरेवाडी येथील ही घटना आहे.

Palghar Rain : पालघरच्या अनेक भागात पावसाची संततधार

पालघरच्या अनेक भागात पावसाची संततधार कायम आहे. डहाणू ,बोईसर, पालघर, चिंचणीसह परिसरात पावसाची रिपरिप सुरू आहे. आज आणि उद्या पालघर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Thane News : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकात मोठा पोलीस बंदोबस्त 

आज महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. निषेध आंदोलन होत असतानाच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांच्या वतीने दंगल जन्य परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी पाळली जाणार आहे.

Sharad Pawar News :  शरद पवार आज मूक आंदोलनात सहभागी होणार

पुण्यात शरद पवार आज मूक आंदोलनात सहभागी होणार आहे. पुण्यातील पुणे स्टेशनजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मूक आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील मोदीबाग येथून साडे नऊ वाजता पवार निघतील. तसेच त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील असणार आहेत.

Maharastra Politics : मंत्री तानाजी सावंत यांचा पुतण्या अनिल सावंत शरद पवारांच्या भेटीला

मंत्री तानाजी सावंत यांचा पुतण्या अनिल सावंत शरद पवारांच्या भेटीला

पुण्यातील मोदी बागेत पवारांच्या भेटीसाठी दाखल

भेटीत राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.

PM Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत.

कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मोदी कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भातही मोदी कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. सोबतच नवीन पेन्शन योजना (NPS) आणि 8 व्या वेतन आयोगाबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Ahmednagar News : नगरमध्ये रेलरोको आंदोलन करणारांना समन्स 

नगरच्या पुणतांबा गावात रेलरोको आंदोलन करणाऱ्यांना समन्स देण्यात आलं आहे.

15 ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात रेलरोको आंदोलन करण्यात आलं होतं.

विविध मागण्यांसाठी नागरीकांनी रेल्वेलाईनवर ठिय्या केला होता.

आंदोलनामुळे चार तास रेल्वेसेवा झाली ठप्प होती.

आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या १० जणांना रेल्वे पोलीसांनी बजावली नोटीस

Pune News : पुणे पोलीस शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची घेणार बैठक

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची घेणार बैठक घेणार आहे. पोलिसांनी 29 ऑगस्टला बैठक बोलावली आहे.

Shikhar Dhawan Retirement :   क्रिकेटपटू शिखर धवनने केली निवृत्तीची घोषणा

क्रिकेटपटू शिखर धवनने निवृत्तीची घोषणा केली. शिखरने एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची आज संततधार सुरु आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भागात रात्रीपासून संततधार पाऊस सुरु आहे. सह्याद्री पट्ट्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडीसह दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. कुडाळ तालुक्यातील भंगसाळ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, स्लीप वाटण्यावरून वाद

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

SCROLL FOR NEXT