Devendra Fadanvis  Saam Tv
महाराष्ट्र

Fraud News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पी. ए असल्याचे सांगत १५ लाखांची फसवणूक; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Breaking News: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत तब्बल १५ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

सुरज सावंत

Fraud News:

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत तब्बल १५ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून या प्रकाराने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis News) यांचा पी. ए असल्याचे दोन जणांनी १५ लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. सोसायटीचे काम करून देण्याच्या नावाखाली आरोपींनी ही फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. सुहास महाडिक आणि किरण पाटील अशी या दोघांची नावे आहेत.

यातील सुहास महाडिक याच्यावर या पूर्वीही आग्रीपाडा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या दोघांवर फसवणूक प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात १७०, ४१९, ४२०,३४ भा द वी कलमातर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मरीन ड्राइव्ह पोलिस करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या स्मार्ट सिटी बस स्वच्छतेच्या ठेकेदराची चार महिन्याचे सुमारे सात लाखाचे बिल काढण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच घेताना स्मार्ट सिटीच्या सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ऋषिकेश श्रीरंग इंगळे असे लाच घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangmeshwar Amba Ghat : संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर दरड कोसळली, वाहतूक पूर्णत: ठप्प; कोकणात जाणाऱ्यांचे हाल

Viral Video: आधी कानाखाली मारली नंतर उचलून आपटल; उधारीवरून ग्राहक अन् दुकानदाराचं भांडण पेटलं, Video व्हायरल

Maharashtra Live Update: पुण्यातील बॉलर पबवर गुन्हा दाखल

Raj Kundra Video: "माझी एक किडनी तुमच्या नावावर..."; शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचं वचन, प्रेमानंद महाराज भावुक

Pandharpur News: तिरंगा रंगात रंगले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT