Maharashtra SSC Result 2025 Saam
महाराष्ट्र

10th SSC Result: मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, बोर्डाकडून अधिकृत घोषणा

10th SSC Result Date and Time : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल उद्या म्हणजेच १३ मे रोजी जाहीर होणार आहे.

Bhagyashree Kamble

MSBSHSE SSC Result 2025 Date and Time: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल उद्या म्हणजेच १३ मे रोजी जाहीर होणार आहे. १३ मे रोजी सकाळी ११ वाजता बोर्डाचे अध्यक्ष निकाल जाहीर करतील. नंतर १ वाजता अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या बारावीच्या निकालानंतर दहावीचे विद्यार्थी आपल्या निकालाच्या प्रतिक्षेत होते. अनेक अंदाज आणि संभाव्य तारखाही समोर येत होत्या. बोर्डाकडूनही अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती.

मात्र, आता बोर्डाने अधिकृतपणे दहावीच्या निकालाबाबत घोषणा केली आहे. दहावीचा निकाल उद्या म्हणजेच १३ मे रोजी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळी ११ वाजता मंडळाचे अध्यक्ष पत्रकार परिषदेत निकालाची औपचारिक घोषणा करतील. त्यानंतर दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत निर्णायक असणार असून त्यानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.

दहावीचा निकाल विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा असतो. यानंतरच त्यांना आपले करिअर आणि पुढील शिक्षणाची दिशा ठरवण्याची संधी मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT