Beed Politics Saam Tv
महाराष्ट्र

Beed Politics : मंत्रिपद जाताच पडद्यामागून मुंडे सक्रीय? धसांनंतर वाढल्या क्षीरसागरांच्या अडचणी?

Beed News : मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे पडद्यामागून सक्रीय झाल्याची चर्चा रंगलीय. कारण आधी धस आणि आता संदीप क्षीरसागरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्याची कारणं नेमकी काय आहेत? आणि मुंडे पडद्यामागून खरच सक्रीय झाले आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

भाजप आमदार सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेच्या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा पीए आणि कार्यकर्त्याकडून शोरुमच्या मॅनेजरला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. बीडमधील गुंडागर्दीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय..त्यामुळे संदीप क्षीरसागर यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत.

बीडमध्ये गुंडागर्दी, आता क्षीरसागरही अडचणीत?

धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या टोळीकडून सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला. या राजीनाम्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच विरोधकांचे व्हिडीओ बाहेर येण्यास सुरुवात झाल्याने मुंडे पडद्यामागून सक्रीय झालेयत का अशी चर्चा रंगलीय.

पडद्यामागून मुंडे सक्रीय, धस-क्षीरसागर अडचणीत?

- सुरेश धसांचा निकटवर्तीय खोक्या भोसलेच्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

- खोक्या भोसले पैसे उधळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल

- खोक्याकडून वन्यजीवांच्या कत्तलीचे आरोप

- क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याचा मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

- धनंजय मुंडेंचं समर्थन करणारे लक्ष्मण हाके आणि टी पी मुंडे धसांविरोधात मैदानात

बीड जिल्ह्याला गुंडागर्दी काही नवी नाही. आधी धस आणि त्यानंतर संदीप क्षीरसागरांशी संबंधीत गुंडागर्दी समोर आलीय. त्यामुळे पुढचा नंबर नेमका कुणाचा लागणार आणि या गुंडागर्दीवर प्रशासन नेमकी काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT