Shivsena-Congress Saam TV
महाराष्ट्र

Political News: विरोधी पक्षनेते पदाचा तिढा कायम, भास्कर जाधवांना पाठिंबा नाहीच; काँग्रेसला मात्र लोकलेखाच्या अध्यक्षपदाचे वेध

Opposition Leader Maharashtra: राज्याचं अर्थसंकल्प सादर झालं. अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला. मात्र, तरीही विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत काही निर्णय घेण्यात आलेला नाही.

Bhagyashree Kamble

विधानसभा निवडणूक झाली महायुतीचं सरकार आलं. राज्याचं अर्थसंकल्प सादर झालं. अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला. मात्र, तरीही विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत काही निर्णय घेण्यात आलेला नाही. विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गटानं पाठवलेल्या भास्कर जाधव यांच्या नावाला पाठिंबा देणारे पत्र महाविकास आघाडीतील अन्य पक्षांनी दिले नाही.

उलट काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनी लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. काँग्रेसचे विजय वड्डेटीवार, नाना पटोले, नितीन राऊत या पदासाठी उत्सुक असल्याची माहिती समोर आली आहे.

विधानसभेतील सदस्यसंख्येच्या किमान १० टक्के बळ असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देण्यात येतं. त्यानुसार, ठाकरे गटानं विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीबाबात पत्र पाठवले. मात्र, त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जोडपत्र नाही. एकट्या शिवसेना ठाकरे गटाकडे १० टक्के म्हणजेच २८ आमदार नाहीत. त्यामुळे नियमावली तपासल्या जात आहेत.

नारायण राणेंनी जेव्हा शिवसेनेला राम राम केला. तेव्हा रामदास कदमांना विरोधी पक्षनेता करण्याचा दावा सादर झाला होता. तेव्हाही युतीत सहभागी असलेल्या भाजपने पाठिंबापत्र दिले नव्हते. या पाठिंब्याच्या मुद्द्यावर महाअधिवक्त्यांचे मत घेण्यात आले होते.

आता शिवसेनेनं विरोधी पक्षनेते पदासाठी दावा केला आहे. मात्र, काँग्रेसनं याला पाठिंबा दिला नाही. जर मविआतील सहकारी पक्षांनी पाठिंब्याचे पत्र दिल्यास सदस्यसंख्येचा निकष पूर्ण होईल. मात्र, महाआघाडीतील नेत्यांनी पाठिंबा आहे, पण पत्राची गरज नाही, असं सांगत ते दिलेच नाही. दरम्यान, काँग्रेसनं लोकलेखा समितीचे अध्यक्षपद आम्हाला द्या, असा आग्रह धरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल'; येरवडा ते कात्रजदरम्यान होणार उभारणी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

Vidhan Parishad Election: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना कोणाला किती मिळाल्या जागा?

Mishti Doi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा गोड, मलाईदार मिष्टी दोई

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT