महाराष्ट्र

Maharashtra Election: बंडखोरीचा 'मावळ' पॅटर्न; मावळमध्ये महायुतीला धक्का, अपक्ष बापू भेगडेंना आघाडीचा पाठिंबा

Maharashtra Election: राजकारणातील बंडखोरी सर्वांना माहितीये. मावळमधील बंडखोरी पाहिल्यानंतर राजकारणात बंडखोरीचा नवा पॅटर्न रुळला असल्याचं दिसतंय. नेमका काय पॅटर्न आहे हे जाणून घेऊ.

Girish Nikam

मावळमध्ये राजकीय समिकरणे वेगानं बदलत आहेत. बंडखोरी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या बापू भेगडेंना शरद पवारांच्या पक्षानेही पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे अपक्ष लढणाऱ्या बापू भेगडे यांची ताकत वाढली आहे.

पुण्यातील मावळात गेल्या काही दिवसांपासुन राजकीय हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळत आहे. अजित पवारांनी विद्यमान आमदार सुनील शेळकेंना उमेदवारी जाहीर करताच महायुतीत मोठा बॉम्ब फुटला. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंसह मावळमधील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. बंडखोरी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर केलाय. विशेष म्हणजे बापू भेगडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानेही जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बापू भेगडे यांची ताकत वाढली आहे.

अजित पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने खूप दुःख झालं आहे. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढवतोय, असं बापू भेगडेंनी जाहीर केलंय. दुसरीकडे मावळमध्ये भाजपला आणखी एक धक्का बसलाय. बाळासाहेब नेवाळे यांनी प्रदेश सहकार आघाडी सहसंयोजक पदाचा राजीनामा दिलाय. बाळासाहेब नेवाळे हे दूध संघाचे अध्यक्षही होते. मावळमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे. मावळमध्ये बंडखोर विजयाचा झेंडा फडकावणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT