Shirpur Constituency 
महाराष्ट्र

Saam Exit Poll: शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून काशीराम पावरा मारणार बाजी? पाहा Exit Poll

Shirpur Constituency: शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये काशीराम पावरा आणि बुधामल पावरा यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघामध्ये भाजपचं पारडं जड असल्याचे दिसून येत आहे.

Dhanshri Shintre

सध्या महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी सर्वत्र विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. २३ तारखेला मतमोजणाी होणार आहे. यासंदर्भात सकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला आहे. शिरपूर मतदारसंघातून भाजपचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे या ठिकाणी काशीराम पावरा यांना जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे. काशीराम पावरा या ठिकाणी निवडून येऊ शकतात.

शिरपूर विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध भाकप अशी लढत होती. निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. भाजपच्या उमेदवाराचं या मतदारसंघात वर्चस्व पाहायला मिळालं. एक्झिट पोलमधून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शिरपूर विधानसभेचे संभाव्य आमदार हे भाजपचे काशीराम पावरा असतील असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध भाकपचे बुधामल पावरा यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण भाजपचे उमेदवार काशीराम पावरा हे आमदार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.

शिरपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. येथे सहा उमेदवारांमध्ये सामना रंगला. यात प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि तीन अपक्ष असे लढाईचे चित्र होते. सहा उमेगवार असले तरी प्रामुख्याने सामना जो झाला तो भारतीय जनता पक्षाचे उमेदवार काशीराम पावरा, भारतीय कम्यनिस्ट पक्षाचे उमेदवार बुधामल पावरा आणि अपक्ष उमेदवार डॉ. जितेंद्र ठाकूर यांच्यात झाला. काशीराम पावरा चौथ्यांदा या मतदारसंघातून उमेदवारी लढत आहेत. दोन वेळेला त्यांना आव्हान देणारे हे डॉ. जितेंद्र ठाकूर अपक्ष उमेदवार होते. आता या निवडणुकीचा निकाल कसा लागतो आणि कोणाला किती मताधिक्य मिळतं याकडे शिरपूरकरांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT