सध्या महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी सर्वत्र विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. २३ तारखेला मतमोजणाी होणार आहे. यासंदर्भात सकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे याठिकाणी प्राजक्त तनपुरे यांना जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे. प्राजक्त तनपुरे याठिकाणी निवडून येऊ शकतात.
राहुरी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्राजक्त तनपुरे निवडणूक लढत आहेत. तर भाजपाकडून शिवाजीराव कर्डीले हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघात सकाळच्या एक्झिट पोलनुसार, प्राजक्त तनपूरे हे संभाव्य आमदार होऊ शकतात. तर शिवाजीराव कर्डीले यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.
या मतदारसंघामध्ये राहुरी नगर एकूण ३०८ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. राहुरी मतदानसंघामध्ये एकूण ३ लाख २४ हजार ५९ एवढे मतदार आहेत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत १ लाख ९८ हजार ९२८ म्हणजेच ६१.४० टक्के मतदान झालेले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे विरोधात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्यात आहे. दोघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत आहे. या मतदारसंघामध्ये प्राजक्त तनपुरे यांचे काम अतिशय चांगले असण्याने त्यांची विजयाच्या दिशेने वाचटाल सुरु आहे असं म्हटलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.