Maharashtra Politics  Saam tv
महाराष्ट्र

Beed Politics: महायुतीमधील कलह चव्हाट्यावर, भाजप नेत्याचा थेट अजित पवारांना टोला

Suresh Dhas Criticized Ajit Pawar Group: बीडच्या आष्टी मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांनी आता मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर टीके केली.

Priya More

विनोद जिरे, बीड

बीड - बीडच्या आष्टीत महायुतीत वादाची ठिणगी उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. 'पहिलेच तुमच्या घड्याळाचे बारा वाजले आहेत... दाल मे कुछ तो काला है', असे म्हणत बीडच्या आष्टी मतदासंघाचे भाजप उमेदवार सुरेश धस यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर जोरदार टीका केली. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरेश धस यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

बीडच्या आष्टी मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांनी आता मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर जोरदार टीका केली आहे. पहिलेच तुमच्या घड्याळाचे बारा वाजले आहेत, असे वक्तव्य सुरेश धस यांनी भर प्रचारसभेत केले आहे. त्यांच्या या टीकेमुळे जोरदार चर्चा होत आहे. सुरेश धस हे आष्टी मतदारसंघातील महायुतीमधल भाजपचे उमेदवार आहेत. आष्टी मतदारसंघामध्ये मंगळवारी त्यांची सभा झाली. या सभेदरम्यान त्यांनी अजित पवार गटावर टीका केली.

सुरेश धस यांनी सांगितले की, 'महायुतीचा उमेदवार म्हणून मला घोषीत केले आणि ऐनवेळी घड्याळाचा एबी फॉर्म येतो आणि ते सुद्धा ऐवढ्या जोरात सांगतात की एबी फॉर्म आला. जसं काय डोनाल्ड ट्रम्पच्या पक्षाचा फॉर्म आलाय. पहिलेच तुमच्या घड्याळाचे बारा वाजलेत. लोकांची भावना मोठ्या पवाराकडे आहे. छोट्या पवाराकडे नकारात्मक भावना आहे.'

तसंच,'मग आतून नेमकं चाललंय काय? दाल मे कुछ तो काला है... हे कोणी केलं? घड्याळ चिन्ह दिले गेले, कमळाला रोखण्यासाठी? आणि हे जे केले तर प्रचार सुरु केला. मी तर म्हटलं होतं बिगर चिन्हाची निवडणूक घ्या.', असे म्हणत सुरेश धस यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली. सुरेश धस यांच्या या निर्णयामुळे आणि वक्तव्यावरून बीडमध्ये महायुतीतील वाद चिघळण्याचे चिन्ह दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबई हादरली! ९ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, ६ जणांकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

Skin Care: चेहरा ड्राय झालाय आणि ओपन पोर्स वाढलेत? मग, चेहऱ्यावर रोज स्प्रे करा हे घरी तयार केलेले फेस मिस्ट

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

Lanja Tourism : पावसाळ्यातील नंदनवन! लांजाजवळील 'या' ठिकाणी घ्या निसर्गाचा मनमुराद आनंद

SCROLL FOR NEXT