महाराष्ट्र

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Karad Vidhansabha Election: कराड दक्षिण मतदारसंघामध्ये अतुल भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघामध्ये भाजपचं पारडं जड असल्याचे दिसून येत आहे.

Dhanshri Shintre

सध्या महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी सर्वत्र विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. २३ तारखेला मतमोजणाी होणार आहे. यासंदर्भात एक्झिट पोल समोर आला आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपचं पक्षाचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे या ठिकाणी अतुल भोसले यांना जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे. अतुल भोसले या ठिकाणी निवडून येऊ शकतात.

कराड दक्षिण मतदारसंघामध्ये भाजपकडून अतुल भोसले निवडणूक लढत आहेत. तर काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघात सकाळच्या एक्झिट पोलनुसार, अतुल भोसले हे संभाव्य आमदार होऊ शकतात. तर पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.

कराड दक्षिण मतदारसंघामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना यावेळी धक्का बसण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे भाजपचे अतुल भोसले यांनी मोठं आव्हान उभं केलं.अतुल भोसले यांनी शासकीय योजना प्रभाविकपणे राबविल्या. त्याचबरोबर विकासनिधीही मोठ्या प्रमाणात आणला. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना यावेळी धक्का बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT