Maharashtra Assembly Election 2024 :  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी? CM शिंदेंच्या जवळच्या नेत्याने तारीखच सांगितली

bharat gogawale news : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत आमदार भरत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलं. आमदार गोगावले यांनी थेट निवडणुकीची तारीखच सांगितली.

Vishal Gangurde

सचिन कदम, साम टीव्ही प्रतिनिधी

रायगड : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी विविध मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने देखील बैठकांचा सपाटा लावला आहे. मात्र, निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीची तारीख जाहीर केलेली नाही. त्याआधीच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखेविषयी शिंदे गटातील बड्या नेत्याने मोठं भाष्य केलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसहित महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. विधानसभा निवडवणुकीमुळे राज्यातील नेत्यांना मंडळ वाटप देखील सुरु आहे. एकीकडे ऑक्टोबर महिन्यात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याचदरम्यान शिंदे गटाचे प्रतोद, आमदार भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.

आमदार भरत गोगावले म्हणाले, 'आता मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकत नाही. झाला तरी आम्ही स्वीकारू शकत नाही. आता मोजून २० दिवस शिल्लक राहिले आहेत. येणाऱ्या पुढील ५ तारखेला आचारसंहिता लागते. त्यानंतर नोव्हेंबरच्या १० किंवा १२ तारखेला निवडणुका लागतील. त्यामुळे आता विस्तार होणार नाही. झाला तरी मला वाटत नाही की, कोणी मंत्रिपद घेईल.

मंत्रिपदाच्या आशेवर बोलताना गोगावले म्हणाले, ' आम्ही मंत्रिपदाची आशा कुठे ठेवली आहे. निवडून आल्यावर पुढच्या मंत्रिमंडळात वर्णी लागेल. आता आम्हाला मंत्रिपद दिलं तरी नको आणि होणार पण नाही'.

माजी खासदार हेमंत पाटलांचे राजकीय पुनर्वसन

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत पाटील राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. माजी खासदार हेमंत पाटील यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हेमंत पाटील हिंगोलीचे शिंदे गटाचे माजी खासदार आहेत. हेमंत पाटील यांचं लोकसभेला हिंगोलीमधून तिकीट कापलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 10 सेकंदात धावत्या बसला आग; जीवाची बाजी लावत डिलीव्हरी बॉयने वाचवले प्रवाशांचे प्राण, थरारक व्हिडीओ व्हायरल

Pune Police : पुणे पोलीस दलात मोठी कारवाई, एकाच वेळी तब्बल ३२ पोलिसांची बदली, कारणं आले समोर

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

IIM Mumbai Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार IIM मुंबईत नोकरी; विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai : मंत्रालयातील त्या लिपिकावर कारवाई; तोपर्यंत काम थांबवलं, नरहरी झिरवळ यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT