Belapur Vidhansabha Election 
महाराष्ट्र

Maharashtra Exit Poll : बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

Belapur Vidhansabha Election: बेलापूर मतदारसंघामध्ये मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघामध्ये भाजपचं पारडं जड असल्याचे दिसून येत आहे.

Dhanshri Shintre

सध्या महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी सर्वत्र विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. २३ तारखेला मतमोजणाी होणार आहे. यासंदर्भात एक्झिट पोल समोर आला आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचं पक्षाचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे याठिकाणी मंदा म्हात्रे यांना जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे. मंदा म्हात्रे या ठिकाणी निवडून येऊ शकतात.

बेलापूर मतदारसंघामध्ये भादपकडून मंदा म्हात्रे निवडणूक लढत आहेत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून संदीप नाईक हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघात सकाळच्या एक्झिट पोलनुसार, मंदा म्हात्रे हे संभाव्य आमदार होऊ शकतात. तर संदीप नाईक यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.

संदीप नाईक यांनी अचानकपणे केलेली बंडखोरी आणि पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये पक्षप्रवेश केल्याने अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये देखील रोस्ट पाहायला मिळतोय आणि मंदा म्हात्रे यांच्याबद्दल काहीशी सहानुभुती या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. याच्यामुळे होणारं जे मत विभाजन आहे त्याच्यामुळे कोणाला नक्की फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT