अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; नियमांचे उल्लंघन करुन घेतली कर्जे  Saam tv news
महाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; नियमांचे उल्लंघन करुन घेतली कर्जे

अनिल देशमुख यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थान ज्ञानेश्वरी येथे झालेल्या बैठकीत सचिन वाजे यांना दरमहा बार आणि हॉटेलमधून किमान 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत. ईडीने आता तपासाची व्याप्ती आणखी वाढवली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिरसिंह (Parmbir singh) याच्या तक्रारीनंतर ईडीने १०० कोटीवसूली प्रकरणात स्वतंत्र तपास सुरू केला आहे. या प्रकरणात ईडीने कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना अटक केली आहे. (Anil Deshmukh's difficulty increases; Loans taken in violation of the rules)

संजीव पलांडे जवळपास 20 वर्षांपासून मोठ्या नेत्यांसोबत काम करत आहेत, यावेळी ते देशमुख यांच्यासोबत स्वीय सचिव म्हणून काम करत होते. दरम्यान, मार्च महिन्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्या म्हणण्यानुसार माजी पोलीस अधिकारी सचिन वाजे यांच्यामार्फत पैसे वसूल करत असल्याचे सांगितले.

अनिल देशमुख यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थान ज्ञानेश्वरी येथे झालेल्या बैठकीत सचिन वाजे यांना दरमहा बार आणि हॉटेलमधून किमान 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. सचिन वाजे यांना देशमुख यांचे संरक्षण होते. या बैठकांच्या वेळी त्यांचे स्वीय सहायक त्याठिकाणी उपस्थित असायचे असेही, परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात नमुद केले होते. आतापर्यंत या प्रकरणात 10 वेळा मालकांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले गेले आहे. त्यानुसार त्यांनी आतापर्यंत 4 कोटी रुपये गोळा केले आहेत आणि ते देशमुख यांच्या पीएला आणि पीएसला पाठवल्याचे पुरावे इडीला सापडले आहेत. 24 जून रोजी ईडीने मुंबई पोलिस डीसीपी राजू भुजबळ यांचा जबाब नोंदवल्या नंतर छाप्यांची प्रक्रिया सुरू केली.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT