Akola News x
महाराष्ट्र

Maharashtra : नेत्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला, समर्थकांनी हल्लेखोरांचे घर फोडले, कार जाळली

Shocking : वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याच्या मुलावर शेजारी राहणाऱ्या एकाने हल्ला केला. ही माहिती मिळताच नेत्याच्या समर्थकांनी हल्लेखोराच्या घराची तोडफोड केली आणि त्याची कार जाळली.

Yash Shirke

  • वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांच्या मुलावर जीवघेणा हल्ला

  • पातोडे यांच्या समर्थकांकडून हल्ला करणाऱ्या तरुणाच्या घराची आणि वस्तूंची तोडफोड

  • त्यानंतर घराच्या अंगणात उभी असलेली कार देखील आक्रमक झालेल्या समर्थकांनी पेटवून दिली

अक्षय गवळी, साम टीव्ही, प्रतिनिधी

Shocking News : अकोला येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते राजेंद्र पातोडे यांच्या मुलावर एकाने हल्ला केला. या हल्ल्यात पातोडे यांचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला. हल्ल्याची माहिती मिळताच राजेंद्र पातोडे यांच्या समर्थकांनी हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या घराची तोडफोड करत घराबाहेरील कार जाळली.

मिळालेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीचेa प्रदेश महासचिव आणि प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांच्या मुलावर आज (५ ऑगस्ट) शेजारी राहणाऱ्या इंगोले कुटुंबातील एका सदस्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पातोडे यांचा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली. हल्ल्यामुळे मुलगा गंभीर स्वरुपात जखमी झाल्याचे म्हटले जात आहे.

राजेंद्र पातोडे यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी इंगोले कुटुंबाच्या घरावर हल्ला चढवला. घराची आणि घराच्या आसपास असलेल्या वस्तूंची पातोडेंच्या समर्थकांनी तोडफोड केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी घराच्या अंगणात उभी असलेली कार पेटवून दिली. रागाच्या भरात पातोडे यांच्या कार्यकर्त्यांनी इंगोले कुटुंबाच्या घरावर हल्ला करुन त्यांचे नुकसान केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घराची तोडफोड करुन घरासमोरील कार जाळल्याची माहिती मिळताच अकोल्याचील खदान आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी समर्थकांना, कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार अकोला शहरातील आदर्श कॉलनीमध्ये घडला आहे. या प्रकरणात खदान पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT