Farmers Scheme Saam Tv
महाराष्ट्र

Farmers Scheme: महाराष्ट्रातील ८६ लाख शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार ६ हजार रुपये; काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना?

Namo Shetkari Mahasanman: नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांना २ हजार रुपये मिळणार आहेत. काय आहे ही योजना?

Bharat Jadhav

Namo Shetkari Mahasanman Nidhi Scheme:

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर बनवण्यात आलेली नमो शेतकरी योजना उद्यापासून राज्यात लागू होणार आहे. उद्या शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई-वितरण होणार आहे. या योजनेमुळे राज्यातील सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार रुपयांचा पहिला हप्ता पाठवला जाणार असून या योजनेसाठी १ हजार ७२० कोटी रुपये निधी उपलब्ध केला गेला आहे.(Latest News)

दरम्यान या योजनेमुळे शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान आणि नमो सन्मान योजनेचे मिळून एकूण १२ हजार रुपये वर्षाला मिळणार आहे. पीएम किसान आणि ‘नमो किसान महासन्मान’ योजनेअंतर्गत कृषी विभागाने मोहीम हाती घेण्यात आली. यात ९ लाख ५८ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी, २ लाख ५८ हजार शेतकऱ्यांचे खाते आधार संलग्न, १ लाख २९ हजार शेतकऱ्यांच्या भूमिअभिलेख नोंदी अशा एकूण १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांच्या अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

(सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)

काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

मोदी सरकारकडून देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत येते आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर ४ महिन्यांच्या अंतराने २ हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असतो. त्याचप्रमाणे राज्यात ही नमो शेतकरी महासन्मान योजना राबवली जात आहे. केंद्र सरकार ज्याप्रमाणे ६ हजार रुपये देते त्याच प्रमाणे राज्य सरकार या योजनेतून आता ६ हजार देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळणार आहेत.

जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहेत. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. यामुळे शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी ज्या बँक खात्याचा तपशील दिलाय तोच द्यावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT