Sonia Gandhi saam tv
महाराष्ट्र

Maharashtra: राजकारण तापलं; राज्यातील २५ आमदारांना हवीय सोनिया गांधींची भेट

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काॅंग्रेस आमदारांना हवीय साेनिया गांधींची भेट.

संजय तुमराम

चंद्रपूर : राज्यातील सत्ताधारी काँग्रेसच्या (congress) २५ आमदारांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. राज्यातील (maharashtra) राजकीय (political) स्थितीबद्दल माहिती द्यायची असल्याने पुढील महिन्यात आम्हाला भेट द्यावी अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. (maharashtra congress latest marathi news)

भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे (sangram thopte) यांनी हे पत्र पक्षाध्यक्षांना पाठविले आहे. या पत्रामुळे काँग्रेस वर्तुळात अंतर्गत खदखद असल्याची चर्चा होऊ लागली आहे. काँग्रेस आमदारांची कामे होत नसून किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात नसल्याची या आमदारांची भावना असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वेळ द्यावी अथवा आपल्या वेळेनूसार असेही पत्रात थाेपटे यांनी सोनिया गांधींना लिहले आहे. माझ्या साेबत २० ते २५ आमदारांचे शिष्टमंडळ देखील असेल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT