Mahant Devendra Chaitanya Swami Saam TV
महाराष्ट्र

महंत देवेंद्र चैतन्य स्वामींचा संशयास्पद मृत्यू, मंदिराजवळील बारवेत आढळला मोबाईल; नेमकं घडलं काय?

Mahant Devendra Chaitanya Swami : जालन्यातील भोकरदन तालुक्यात महंत देवेंद्र चैतन्य स्वामी यांचा मृतदेह मठातील खोलीत आढळला होता. घटनेनंतर गायब झालेला त्यांचा मोबाईल मंदिराजवळील बारवेत सापडला आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

Mahant Devendra Chaitanya Swami death case in Jalna : जालन्यातील भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथे महंत देवेंद्र चैतन्यस्वामी ऊर्फ दौलत सातपुते महाराज यांचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी मठातील राहत्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, आता महंतांचा मोबाईल मंदिराजवळील बारवेत (पाण्याचा विहीरसदृश साठा) आढळून आल्याने त्यांच्या मृत्यूबाबतचे रहस्य अधिकच गडद झाले असून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

घटना घडली तेव्हा महंतांचा मोबाईल घटनास्थळावरून गायब होता, ज्यामुळे सुरुवातीपासूनच या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. याप्रकरणी पारध पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून कसून तपास सुरू केला आहे. याच तपासाचा भाग म्हणून, पोलिसांनी मंदिराजवळील बारवेतील पाण्याचा उपसा केला असता, त्यात महाराजांचा मोबाईल आढळून आला.

महंतांनी नेमकी आत्महत्या केली की हा घातपात आहे? घटनेच्या वेळी त्यांचा मोबाईल घटनास्थळावरून कसा गायब झाला? तो पाण्याने भरलेल्या बारवेत कोणी टाकला आणि त्यामागील नेमका उद्देश काय होता? या सर्व गूढ प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत.

महंत देवेंद्र चैतन्यस्वामी यांच्या मृत्यूनंतर गायब झालेला मोबाइल मंदिराजवळील बारवेतील पाण्याचा उपसा करून शोधण्यात आला. या मोबाइलमुळे तपासाला मदत होण्याची शक्यता असून, पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. - सचिन खामगळ, सहायक पोलिस निरीक्षक, पारध

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramayana Collection : 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड! १२व्या दिवशीही कोट्यवधींची कमाई, रणबीर-यश ८०० कोटींचा आकडा गाठण्यासाठी सज्ज

Bad Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलेलं असताना या 5 ड्रिंक्सचं सेवन म्हणजे जणू विषच; कमी वयातच येईल हार्ट अटॅक

Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

आला हिवाळा, दररोज ही फळं खा! राहाल फिट अँड फाईन आणि त्वचाही पाऱ्यासारखी चमकू लागेल

Maharashtra News Live Update: गोदा घाट विद्रूप करणाऱ्या १२ उत्तर भारतीयांना महापालिकेने केला दंड

SCROLL FOR NEXT