Family of Mahadev Munde demands justice as SIT intensifies probe and narco tests are scheduled in the high-profile Parli murder case Saam Tv
महाराष्ट्र

२ वर्षांनंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणात ट्विस्ट; मुंडेंनी घेतलं थेट वाल्मिक कराडचं नाव, बंगल्यावरची पोरं कोण?

Major Twist In Parli Trader Mahadev Munde Murder: बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी घडामोड. वाल्मीक कराड यांचे नाव समोर; सहा जणांची ब्रेन मॅपिंग पूर्ण, तीन जणांची नार्को टेस्ट होणार. पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचे गंभीर आरोप.

Omkar Sonawane

योगेश काशीद, साम टीव्ही

बीडमधील परळी येथे प्रसिद्ध व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. आता या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडचे देखील मुंडे खून प्रकरणात नाव समोर आले आहे. मुंडे याच्या हत्येला आता दोन वर्षे पूर्ण झाली असून यामध्ये खळबळजनक खुलासे केले जात आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. एसआयटी स्थापन करून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुंडे यांच्या पत्नीने केली होती. तसेच पोलीस अधिकाऱ्यांवर त्यांनी गंभीर आरोपही केले आहे.

आता पर्यंत सहा जणांची ब्रेन मॅपिंग तर उद्या तीन जणांची नार्को टेस्ट होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत तपासावर मुंडे यांच्या पत्नीने भाष्य करत खळबळजनक आरोप केले आहे. ज्या आरोपींची ब्रेन मॅपिंग पॉझिटिव्ह आली आहे, त्यांची उद्या नार्कोटेस्ट होणार आहे. SIT आणि IPS पंकज कुमावत यांनी पारदर्शक असा तपास केला आहे. ज्यांची ब्रेन मॅपिंग पॉझिटिव्ह आली आहे. ते सर्व वाल्मीक कराड यांच्या कार्यालयाशी संबंधित असलेले संशयित आरोपी आहेत. वाल्मीक कराड याने तपास थांबवला होता. असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच त्यांच्या संबंधित असलेले संशयित आरोपींचे ब्रेन मॅपिंग पॉझिटिव्ह कसे आले. मात्र पोलिसांनी पारदर्शक असा तपास केला आहे.

घटना घडल्यानंतर सहा महिने मी घरीच होते स्थानिक पोलिसांनी घरी येऊन माझा जवाब नोंदवला परळी पोलिसांनी तपासात खूप दिरंगाई केली. बंगल्यावरील फोन मुळे तपास थांबवला गेला होता. मात्र मला न्याय पाहिजे आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. न्यायासाठी मी जेव्हा विष प्राशन केले तेव्हा बंद केलेली फाईल तपासासाठी सुरू करण्यात आली. या न्यायामध्ये मला जरांगे पाटील आणि अनेक राजकीय लोकांचे पाठबळ मिळाले असून जरांगे पाटलामुळे मी मुख्यमंत्र्यांना भेटू शकले. मुख्यमंत्र्यांनीही मला एसआयटी स्थापन करून खूप मदत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

नाशिक, अमरावतीनंतर यवतमाळमध्येही लव्ह जिहाद? 'यवतमाळमध्ये 34 अल्पवयीन मुली बेपत्ता'

SCROLL FOR NEXT