महाडमध्ये राणेंच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड ! SaamTv
महाराष्ट्र

महाडमध्ये राणेंच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड !

नारायण राणे यांच्या विरोधात महाड येथे शिवसैनिकांनी निदर्शने केली असून शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या पुतळ्याची पुतळ्याची गाढवावरून धिंड काढली आहे. तसेच त्यांच्या पुतळ्यास चपलेचा हार घालून धिंड काढण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : नारायण राणे यांच्या विरोधात महाड येथे शिवसैनिकांनी निदर्शने केली असून शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या पुतळ्याची पुतळ्याची गाढवावरून धिंड काढली आहे. तसेच त्यांच्या पुतळ्यास चपलेचा हार घालून धिंड काढण्यात आली आहे. यावेळी राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन देखील शिवसैनिकांनी केले.

हे देखील पहा -

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 23 ऑगस्ट रोजी महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह टीका केली आहे. यानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. आज महाड शहर पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

राणेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिवसैनिक चांगलेच संतापले असून आक्रमक झाले आहेत. महाड शहरात नारायण राणे यांच्या पुतळ्या चपलाचा हार घालून गाढवावरून धिंड काढून राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन शिवसैनिकांनी केले. राणेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी मुंबई गोवा महामार्ग अडवून धरला आहे. यावेळी शिवसैनिकांनी राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT