ambenali ghat 
महाराष्ट्र

वाहतुकदारांनाे! आंबेनळी घाटातून जाणार आहात? हे वाचा

ओंकार कदम

सातारा : जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने आणि काही ठिकाणी तर रस्तेच वाहून गेल्याने आंबेनळी घाट ambenali ghat वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आज तब्बल ४५ दिवसानंतर हा घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

सध्या तरी फक्त हलकी वाहनेच या घाटातून प्रवास करू शकतील. अवजड वाहनांना अजून काही दिवस तरी या घाट रस्त्याने येता येणार नाही. त्यामुळे अवजड वाहतुक करणा-या व्यावसायिकांसाठी हा घाट बंदच राहणार आहे. जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावासामुळे येथे मोठमोठ्या दरडी काेसळल्या. या दरडी घाट रस्त्यावर येऊन घाटात अनेक ठिकाणी रस्ता खराब झाला हाेता. काही ठिकाणी तुटला होता. त्यामुळे येथील वाहतुक थांबविण्यात आली हाेती.

तब्बल ४५ दिवस या घाट दुरुस्तीचे काम सुरू होते परंतु अधून मधून या भागात दरडी कोसळत होत्या. आजपासून हा घाट हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे प्रतापगड, महाडकडे महाबळेश्वर मार्गे होणारी वाहतूक सुरू झाली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबई हादरली! भररस्त्यात गोळीबाराचा थरार, एकाच्या पायात घुसली गोळी

Pune News: पुण्यातील मनोरुग्णालयात तरुणाची आत्महत्या, खिडकीला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

इंदिरा गांधींचंही सोनं न खरेदी करण्याचं आवाहन? मोदींसारखाच इंदिरा गांधींचा 1967 साली निर्णय?

आधी डोकी फोडली, आता सत्तेसाठी एकवटली? अंबरनाथ पालिकेत शिंदेसेना-भाजपची युती?

NEET UG परीक्षा रद्द, आता पुढे काय? विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करून फी भरावी लागणार का?

SCROLL FOR NEXT