Washim couple found dead in Morna Lake Saam TV
महाराष्ट्र

जात जिंकली, प्रेम हारलं! घरच्यांच्या विरोधाला कंटाळून तरुण-तरुणीचे टोकाचे पाऊल, तलावात आढळले मृतदेह अन्...

Washim Lover Couple Found Dead : वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मोर्णा तलावात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले. दोघेही काही दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या विवाहाला कुटुंबीयांचा विरोध असल्याची माहिती समोर आली असून, पोलीस तपास करत आहेत.

Bharat Jadhav

  • मोर्णा तलावात आढळला युवक-युवतीचा मृतदेह आढळले.

  • मासेमारीसाठी गेलेल्या वक्तींना आढळले मृतदेह

  • दोघेही १४ ऑगस्टपासून होते बेपत्ता.

मनोज जैस्वाल, साम प्रतिनिधी

प्रेम ना वय बघतं, ना पैसा, ना धर्म ना जात, बस ते बघतं फक्त मन. वाशिममधील २४ वर्षीय महादेव आणि २१ वर्षीय निकिताचंही तसेच होतं. पाण्याप्रमाणे निख्खळ प्रेम. त्या दोघांना लग्न करायचं होतं, सात जन्म सोबत राहायचं होतं. पण या दोघांची प्रेमाला यश मिळालं नाही. त्यांच्या घराच्यांना दोघांचं लग्न मान्य नव्हतं, त्याचं कारण, होतं दोघांची जात.

आपण आधुनिक जगात जगत असलो तरी लोकांच्या मनातील जात ही जात नाही. अजूनही खोट्या प्रतिष्ठेतेसाठी प्रेमविवाहला विरोध होतोय. घरच्यांचा विरोध होत असल्यानं महादेव आणि निकितानं टोकाचा निर्णय घेत वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मोर्णा तलावात उडी घेत आपलं जीवन संपवलं. याबाबतची माहिती पोलिसांनी दिलीय.

मालेगाव तालुक्यातल्या गोकसावंगी गावातील 24 वर्षीय युवक महादेव गजानन आणि 21 वर्षीय निकीता संतोष हे दोघेही 14 ऑगस्टपासून बेपत्ता होते. याप्रकरणी त्यांच्या पालकांनी मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये (मिसिंगची) हरवल्याची तक्रारही दिली होती. मात्र काल या दोघांचेही मृतदेह गावाजवळच असलेल्या मोर्णा तलावात आढळून आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांचे प्रेमसंबंध होते. लग्न करण्यासंदर्भात त्यांनी घरच्यांना माहिती दिली होती.

मात्र दोघेही वेगवेगळ्या जातीतील असल्यानं त्यांच्या घरच्यांचा या आंतरजातीय विवाहाला विरोध होता. घरच्यांना अनेकवेळा समजून सांगूनही ते लग्नाला तयार होत नसल्यानं ते नैराश्यात गेले होते. या दोघांनीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. ते दोघेही मोर्णा तलावाजवळ आले आणि तलावात उडी घेत जीवन संपवलं. बुधवारी मासेमारी करण्यासाठी काही जण गेले होते, तेव्हा त्यांना दोन्ही मृतदेह एकाच ठिकाणी आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह तलावच्या बाहेर काढून पोस्ट मॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवले. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'धनुष्यबाण चिन्ह गोठवा, चोरांना देऊ नका'; एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची मागणी

Gautami Patil: दहीहंडीतला डान्स गौतमीला भोवणार; सण-उत्सवातील अश्लील डान्सचा वाद पेटला

PM मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, पिस्तूलधारी २ जणांना अटक; पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसखोरी कशासाठी?

Manoj Jarange: जरांगे आणि सरकार आमनेसामने, चर्चेसाठी अंतरवालीत जाण्यास विखेंचा नकार

Rahul Gandhi: राहुल गांधी घराणेशाही मोडणार? 2029 साठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT