वंदनझिरा पोलीस स्टेशन, जालना लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

Jalna: प्रेमीयुगुल दीर-भावजयची विष प्राशन करून आत्महत्या! 12 दिवसांपासून होते बेपत्ता

बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा येथील काकासाहेब बबनराव कदम (वय 32) यांच त्यांच्या 27 वर्षीय चुलत भावजयीसोबत प्रेमसंबंध होते.

लक्ष्मण सोळुंके

लक्ष्मण सोळुंके

जालना : बदनापुर तालुक्यातीळ हिवरा राळा गावातून गेल्या 12 दिवसापासून गायब झालेल्या विवाहित नात्याने चुलत दिर आणि भावजयी असलेल्या प्रेमीयुगालानी औरंगाबाद-जालना महामार्गावर करमाड गावाजवळ विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. (Crime News jalna)

बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा येथील काकासाहेब बबनराव कदम (वय 32) यांच त्यांच्या 27 वर्षीय चुलत भावजयीसोबत प्रेमसंबंध होते. 31 जानेवारीला सदर महिला ही माहेरी जानेफळ मिसाळ ता. भोकरदन या ठिकाणी गेली असताना काकासाहेब कदम तिच्यासह पळून गेला होता, या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली होती.

पोलीस गेल्या बारा दिवसांपासून या दोघांचा शोध घेत होते. तर, शुक्रवारी रात्री औरंगाबाद जिल्ह्यातील जालना-औरंगाबाद महामार्गावर एक महिला आणि पुरुष बेशुद्धावस्थेत पडलेले आढळून आल्याने करमाड पोलिसांनी तातडीने त्यांना घाटी रुगणलायत हलविले होते. मात्र, उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्या दोघांचाही मृत्यू झाला. औरंगाबाद घाटी रुग्णालयात (Ghati Hospital Aurangabad) या दोघांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा आणण्यात आला आहे.

हे देखील पहा-

तर, हे प्रेमीयुगल विवाहित असून दोघांना ही दोन दोन अपत्य असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांच्यासह पोलीस कर्मचारी हिवराराळा या ठिकाणी उपस्थित आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : दादरमध्ये उद्धव ठाकरेंचा झेंडा फडकणार, युवा सेनेचा विश्वास

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT