Crime News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Crime: प्रेमाला विरोध, भरचौकात कोयत्याने वार; पंढरपुरात सकाळ सकाळी थरार

Pandharpur Crime News: प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून प्रियकराने प्रेयसीच्या चुलत्याचा काटा काढण्याचा प्रयत्न केला आहे. ही धक्कादायक घटना पंढरपुरात घडली असून, या प्रकणानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Bhagyashree Kamble

भरत नागणे, साम प्रतिनिधी

प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून प्रियकराने प्रेयसीच्या चुलत्याचा काटा काढण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेयसीच्या चुलत्याने त्यांच्या नात्याला विरोध दर्शवला होता. त्यामुळे रागाच्या भरात आरोपीने भर रस्त्यावर चुलत्यावर कोयत्यानं वार करत प्राणघातक हल्ला केला आहे. ही धक्कादायक घटना पंढरपुरात घडली असून, भर रस्त्यावर हा जीवघेणा हल्ला घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून प्रेयेसीच्या चुलत्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली. भर रस्त्यावर सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये नाना निमकर गंभीर जखमी झाले असून, गंभीर हल्ला घडल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमकं घडलं काय?

हल्ल्यात जखमी झालेले नाना निमकर सकाळी मोटारसायकलवरून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जात होते. यादरम्यान, संशयित आरोपी अमित वाठारकर याने गाडी निमकर यांची गाडी अडवली. नंतर धारदार कोयता बाहेर काढत सपासप वार केले. ही घटना घडतच असताना एक वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

आरोपी जेव्हा कोयत्याने निमकर यांच्यावर वार करत होते. तेव्हा वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यानं धाव घेत, त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, भर दिवसा ही प्राणघातक हल्ल्याची घटना समोर आल्यानंतर नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! आरसीबीच्या खेळाडूंचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT