नाशिक, अमरावती, कोल्हापूर आणि आता अकोला. लव्ह जिहादचा भस्मासूर आता अकोल्यात धडकलाय. हरियाणाच्या एका निष्पाप तरुणीला प्रेमाचं आमिष दाखवून अकोल्यात आणलं जातं, तिला ५ दिवस घरात डांबलं जातं गेमिंग अँपच्या आभासी जगात मैत्रीचं जाळं विणून एका तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा हादरवून टाकणारा प्रकार अकोल्यात समोर आलाय.
पोलिसांनी २ मुल असलेल्या जमीर जाहीरुद्दीन काझीला बेड्या ठोकल्यात खऱ्या, पण या प्रकरणामागचं क्रौर्य संताप आणणारं आहे. केवळ गेमिंग एँपवरून ओळख करून, फूस लावून या मुलीला महाराष्ट्रात आणलं गेलं. ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाही, तर हे एक नियोजनबद्ध षडयंत्र असल्याचा आरोप आता विश्व हिंदू परिषदेनं केलाय.
अकोल्यातील हा प्रकार म्हणजे पुन्हा एकदा दिलेला धोक्याचा इशारा आहे. लव्ह जिहादची पाळंमुळं किती खोलवर रुजलीत, हे आता उघड होतंय. गेमिंग अॅपवरची एक साधी फ्रेंड रिक्वेस्ट मुलींच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करतेय. जमीर काझीसारखे नराधम आता तंत्रज्ञानाचा ढाल म्हणून वापर करत शिकार शोधतायत. पण आता वेळ आलीय, या जिहादींना ओळखण्याची आणि सावध होण्याची.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.