उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य लाभो; नारायण राणेंच्या शुभेच्छा! संजय जाधव
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य लाभो; नारायण राणेंच्या शुभेच्छा!

केंद्रीय मंत्री नारायण राणे आज बुलढाण्यातील चिखली येथे उद्योजकता प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : केंद्रीय मंत्री नारायण राणे आज बुलढाण्यातील चिखली येथे उद्योजकता प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

हे देखील पहा :

अनेक माजी शिवसैनिक आता शिवसेनेवर टीका करीत आहे असं विचारलं असता राणे म्हणाले ते खरं आहे. कारण अनेक सैनिकांची ती भावना आहे. काही माजी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांकडे पाठविण्याची भाषा वापरली ती चुकीची आहे. उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा ही त्यांनी यावेळी दिल्या पण मुख्यमंत्री पदाचे गुण त्यांच्यात नाही असं राणे म्हणाले.

हे सरकार आता फक्त साडेसात दिवस टिकेल अशी मिश्किल टीका ही त्यांनी केली. भुजबळांना अटक का झाली, या प्रश्नावर राणे म्हणाले, ते काय तिर्थयात्रेला गेले होते का.? ते आजकाल जास्त बोलायला लागले अशी टीका ही यावेळी नारायण राणे यांनी भुजबळांवर केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

SCROLL FOR NEXT