Mumbai Pune Highway Saam tv
महाराष्ट्र

Mumbai Pune Highway : लोणावळा शहरातून अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी; पुणे जिल्हाधिकारी यांचे आदेश

दिलीप कांबळे

मावळ : लोणावळा शहरांमधून जाणाऱ्या जुन्या मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर सर्व जड आणि अवजड वाहनांना आता कायमस्वरूपी बंदी करण्यात आली आहे. सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेमध्ये अवजड वाहतुकीस बंदी करण्यात आल्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी काढले आहेत.

लोणावळा (Lonavala) शहरातून जुना मुंबई- पुणे महामार्ग गेला आहे. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. दरम्यान लोणावळा शहरामध्ये यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असते. शिवाय अपघाताचे प्रमाण देखील मागील काही दिवसात वाढले आहेत. शहरात होत असलेली वाहतूक कोंडी व अपघाताच्या समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी हा आदेश लागू करण्यात आला आहे. १४ जून रोजी याबाबतची अधीसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. 

हा असेल मार्ग 

सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीमध्ये सर्व प्रकारची जड अवजड वाहने लोणावळा शहरातून नेण्यास बंदी आहे. हि वाहने मनशक्ती येथून मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर वळवण्यात येणार आहेत. तसेच खंडाळ्याच्या दिशेने येणारी सर्व जड अवजड वाहने यांना देखील बंदी घालण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT