Shirdi Politics BJP-Shiv Sena saam Tv
महाराष्ट्र

Shirdi Politics: शिवसेनेकडे असलेल्या जागेवर भाजपचा डोळा; विखे पाटलांच्या विधानामुळे खळबळ

Shirdi Politics : राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरू झालंय त्यातच भाजप राज्यातील लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढू इच्छित आहे. शिवसेना शिंदे गटाकडे असणारी शिर्डी लोकसभेच्या जागेवर देखील भाजपचा डोळा असल्याचे समोर आलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(सचिन बनसोडे, अहमदनगर)

Lok Sabha Election Shirdi Politics BJP-Shiv Sena :

शिवसेना शिंदे गटाकडे असणारी शिर्डी लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलीय. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी देखील याबाबत सूचक विधान करत जी कार्यकर्त्यांची भावना आहे, तीच माझी भावना असल्याचे म्हटले आहे.. त्यामुळे शिंदेंकडे असणाऱ्या शिर्डीच्या जागेवर भाजपचा डोळा असल्याचं समोर आलंय. विद्यमान शिवसेनेच्या खासदाराच्या कामावर भाजप नेते नाराज आहेत.(Latest News)

राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरू झालंय त्यातच भाजप राज्यातील लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढू इच्छित आहे. शिवसेना शिंदे गटाकडे असणारी शिर्डी लोकसभेच्या जागेवर देखील भाजपचा डोळा असल्याचे समोर आलंय. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी शिर्डीत बैठक घेत ही जागा भाजपलाच मिळावी, अशी आग्रही मागणी केली आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे केवळ नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे या मतदारसंघात दोनदा निवडून आलेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिर्डी लोकसभेअंतर्गत येणाऱ्या ६ विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद आहे. ही जागा भाजपला मिळाल्यास येथे १०० टक्के भाजपचा खासदार होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. राज्य सरकारच्या माध्यमातून मतदारसंघात विकास झाला मात्र स्थानिक खासदारांकडून अपेक्षित विकासकामे झाली नाहीत. आम्ही दोन वेळेला मोठ्या मताधिक्याने खासदार सदाशिव लोखंडे यांना निवडून दिले मात्र याचा अर्थ असा नाही की त्यांनी काही करायचे नाही अशा शब्दात भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या खासदाराबद्दल नाराजी व्यक्त केली.

देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाजपचे खासदार असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात विकास झालाय. या मतदारसंघात भाजपचा खासदार झाला तर शिर्डीसह जिल्ह्याचा विकास होईल. येथील जनतेची आणि भाजप कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने पक्षाने ही जागा भाजपकडे घ्यावी असं भाजप कार्यकर्त्यांनी म्हटलंय.

दरम्यान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील शिर्डी लोकसभेच्या जागेबाबत सूचक वक्तव्य केलंय. शिर्डीची जागा भाजपला मिळावी ही कार्यकर्त्यांची भावना आहे आणि जी कार्यकर्त्यांची भावना आहे तीच माझी भावना असल्याचे विखे पाटलांनी म्हटल्याने शिवसेनेच्या जागेवर भाजप आपला दावा ठोकणार असल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

Maharashtra News Live Updates: सोलापुरात आदिवासी भटके विमुक्त समाजाकडून भाजप उमेदवाराला पाठिंबा

SCROLL FOR NEXT