satara, lcb SaamTv
महाराष्ट्र

Satara News : एलसीबीची माेठी कामगिरी, दहिवडीतील 'ती' चाेरी उघडकीस; नऊ लाखांचे साहित्य जप्त

या वाहनाची तपासणी करुन चालकास वाहनातील मालाबाबत प्रश्न विचारले.

ओंकार कदम

Satara News : दहिवडी येथून कोल्हापुरी बंधाऱ्यावरील लोखंडी प्लेटा चोरणाऱ्या संशयित आरोपीला बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात सातारा (satara) स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पाेलिस त्याच्याकडून आणखी कसून तपास करीत आहेत. (Breaking Marathi News)

पाेलिसांना (police) गोपनीय माहितीच्या आधारे सुमारे दहा लाखांचा चाेरीचा माल घेऊन काही जण सातारा येथे येणार असल्याचे समजले. त्यानंतर पाेलिसांनी शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात सापळा रचला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक संताेष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने एका माल वाहू गाडीला थांबण्यास सांगितले. परंतु चालकाने गाडीचा वेग वाढवला. त्यामुळे पाठलाग करून पाेलिसांनी चालकास ताब्यात घेतले.

या वाहनाची तपासणी करुन चालकास वाहनातील मालाबाबत प्रश्न विचारले. चालकाची भांबेरी उडाली आणि पाेलिसांनी सर्व माहिती सांगितली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यावरील लोखंडी प्लेटा जप्त करण्यात आल्या आहेत.

सुमारे नऊ लाख तीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संबंधित चालकावर गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. त्याच्या साथादीराचा शाेध सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT