Liquor Price Hike Saam tv
महाराष्ट्र

Liquor Price Hike : महाराष्ट्रात दारू महागणार, तळीरामांची झिंग उतरवणारा सरकारचा निर्णय

Liquor Price Hike in Maharashtra : महाराष्ट्रात दारू महागली आहे. तळीरामांची झिंग उतरवणारा निर्णय सरकारने घेतला आहे.

Vishal Gangurde

मद्य प्रेमींसाठी सरकारने मोठा दणका दिलाय. महाराष्ट्रात दारू महागणार आहे. भारतीय बनावटीची विदेशी दारूच्या किमतीत दीड टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय.. हॉटेलमध्येही शॉपसारखी मद्याची विक्री करता येणार आहे. कराराद्वारे भाडेतत्त्वावर रेस्टॉरंटला विदेशी दारूविक्रीस परवानगी देण्यात आलीय. त्यामुळे हॉटेल रेस्टॉरंटमधील मद्य विक्रीवर 10 ते 15 टक्के अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय.

महाराष्ट्रातील तळीरामांची खिशाला कात्री लावणारा निर्णय राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. सरकारच्या एका निर्णयाने महाराष्ट्रातील दारू महागली आहे. भारतीय बनवाटीच्या विदेश मद्यावर तब्बल दीड टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे सरकारच्या निर्णयामुळे १४ हजार कोटींचा महसूल वाढवणार आहे. महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने निर्णय घेतला आहे.

उत्पादन शुल्क विभागाकडून मद्याच्या दर वाढ करण्यात आली आहे. १८० मिली मद्याच्या दरात किरकोळ वाढ करण्यात आली आहे. तर देशी मद्य ८० रुपये, राज्यातील मेड लिकर १४८ रुपये, भारतीय बनावटीचे विदेश मद्य २०५ रुपये, विदेशी मद्याच्या प्रिमीयम ब्रँडची किंमत ३६० रुपये इतकी झाल आहे. तसेच मद्य शुल्कवाढीसह सीलबंद मद्य विक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्वावर चालवण्यात मान्यता देण्यात आली आहे. यावर एकूण दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.

दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाला बळकटी देण्यासाठी या विभागात १२२३ पदे नव्याने भरली जाणार आहेत. या विभागाच्या मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरु करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT