अशोक चव्हाणांच्या खात्यावर लेटरबॅाम्ब  संजय डाफ
महाराष्ट्र

महाविआत एका मंत्र्याचा दुसऱ्यावर लेटरबॉम्ब, अजित पवारांचा चव्हाणांच्या खात्यावर आरोप

राज्य वस्तू व सेवाकर विभागाचं सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सध्या मंत्र्या-मंत्र्या मध्येच कलगीतुरा रंगल्याचे चित्र समोर येत आहे. अजित पवार ( Ajit Pawar) यांच्याकडे असलेल्या राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाने अशोक चव्हाण यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी अनियमिततेची तक्रार केली आहे. जवळपास 9 कोटी रुपयाच्या कामात अनियमितता आहे अशी तक्रार यामध्ये नमूद आहे.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामांमध्ये गैरव्यवहार होत आहेत असा आरोप अजित पवार यांच्या खात्याकडून करण्यात आला आहे. नागपूर मधील राज्य व वस्तू सेवा या विभागातून नूतनीकरणासाठी जवळपास 9 कोटी रुपयांचे काम केले होते परंतु हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे या कामामध्ये गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार करण्यात आली आहे. एक वर्षापासून ही कामे करण्यात येत होती. यामुळे या कामांमध्ये अनियमितता असून भ्रष्टाचार झाला आहे तसा आरोप वस्तू व सेवा कर विभागाने केला आहे. आणि त्यांनी याबाबत थेट लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे आता याबाबतची मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

Mithila Palkar: परी म्हणू की सुंदरा...; मिथिला पालकरचा हटके स्वॅग

Panvel Tourism: अवघ्या १०० रूपयांत फिरा पनवेलमधील ही ठिकाणे, विकेंडला येईल फुल टू मज्जा

Pune News: अंगावर घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण; पुण्यात खळबळ

Maharashtra News Live Update: भोंदूबाबाला अटक झाल्याच्या दिवशीच, पत्नीच्या नावावर जमीन; व्यवहारावर संशय

SCROLL FOR NEXT