Fear grips Hingoli villages after repeated leopard sightings near human settlements. saamtv
महाराष्ट्र

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

Leopard Terror : हिंगोलीमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. बिबट्यामुळे शेतकऱ्यांनी काम थांबवले आहे. वन विभाग बिबट्याला पकडेपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येण्याचा निर्णय घेतलाय.

Bharat Jadhav

  • हिंगोली जिल्ह्यात बिबट्याच्या दहशतीमुळे गावकरी भयभीत.

  • शेतकऱ्यांनी शेतीची कामे बंद ठेवत चक्काजाम केला.

  • पोतरा गावासह सात गावांतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय.

संदीप नागरे, साम प्रतिनिधी

संपूर्ण राज्यात बिबट-मानवी संघर्ष वाढलाय. मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचा संचार वाढला आहे. दररोज बिबट्यांच्या हल्ल्या घटना घडत आहेत. हिंगोलीत तर बिबट्याच्या दहशतीनमुळे तेथील शेतकऱ्यांची कामे बंद झाली आहेत. तर पोतरा गावातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेची शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पोतरा गावातील गावकऱ्यांनी घेतलाय.

वनविभाग जोपर्यंत बिबट्या जेरबंद करणार नाही तो पर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतलीय. जिल्हा परिषदेची शाळा गावातील जंगलाला लागून असल्याने धोका असल्याने गावकऱ्यांनी शाळा बंदचा निर्णय घेतलाय. कळमनुरी तालुक्यातील पोतरा आणि परिसरातील सात गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामुळे मोठी दहशत पसरलीय.

सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याने गावालगतच्या आखाड्यावर हल्ला करत दोन वर्षांच्या वासराचा फडशा पाडला. शिवारात चक्क तीन बिबटे पाहिल्याचा दावा एका शेतकऱ्याने केल्यानं गावात भीतीचे वातावरण आहे. तेलंगवाडी, पोत्रा, सिंदगी शिवारात गावकरी भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत.

बिबट्याच्या दहशतीने गावकरी धास्तावले आहेत. शेत शिवारातील कामे सोडून शेकडोंच्या संख्येने गावकरी शेकोट्या करून बसले आहेत. कधी आणि कसा बिबट्या गावात येईल आणि हल्ला करेल या भितीने नागरिक धास्तावले आहेत. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामधील पोत्रा गावात ग्रामस्थ रात्र जागून काढत आहेत. तर पोतरा गावातील लोकांनी मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतलाय.

कळमनुरी तालुक्यातील पोतरा शिवारामध्ये बिबट्या आढळून आल्यानंतर वन विभागाच्यावतीने त्याला जेरबंद करण्यासाठी हालचाली तीव्र करण्यात आल्यात. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ठीकठिकाणी २५ कॅमेरे लावण्यात आलेत. आखाडा बाळापूरपासून जवळच असलेल्या पोतरा शिवारामध्ये मागील दोन दिवसांपूर्वी बिबट्याने शेतशिवारावरील आखाड्यात बांधलेल्या शेळ्या-वासरांवर हल्ला करत त्यांचा फडशा पाडला होता. परिसरातील शेतकरी, शेतमजूर, महिला मजुरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमान अपघातामागचं कारण समोर येणार, VSR विमान कंपनीच्या तपासण्या पूर्ण

Navi Mumbai Crime: “पोलीस ठाण्यात गेलास तर मर्डर”; खारघरमध्ये तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

राज्यसभेवरून मविआत 'महासंग्राम', पवारांना राज्यसभा देण्यास कॉंग्रेसचा विरोध

Ajit Pawar Death: मोठी बातमी! अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य समोर येणार, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरीत्या डाउनलोड

जो जीता वही 'सिकंदर' ! टी २० वर्ल्डकपमध्ये दुसऱ्यांदा सर्वात मोठा उलटफेर, झिम्बाब्वेचा करिष्मा; आधी ऑस्ट्रेलियाला, आता श्रीलंकेला लोळवलं

SCROLL FOR NEXT